मेधा गाडगीळ यांची न्यायाधीकरणावर नियुक्ती
@maharashtracity
मुंबई: महाराष्ट्र सनदी सेवेतील १९८३ च्या बॅचच्या निवृत्त आयएएस अधिकारी श्रीमती मेधा गाडगीळ यांची ‘मॅट’-महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण येथे सदस्य (प्रशासन) या पदावर नेमणूक करण्यात आली आहे.
२९ वर्षानंतर एका महिला अधिकाऱ्यास हा बहुमान मिळत आहे. मॅटच्या अध्यक्षा न्यायमूर्ती मृदूला भाटकर यांच्या उपस्थितीत नुकतीच श्रीमती मेधा गाडगीळ यांनी सुत्रे स्वीकारली.
मेधा गाडगीळ यांनी ३६ वर्षाच्या सेवेत सहाय्यक जिल्हाधिकारी ठाणे , जिल्हाधिकारी अहमदनगर, सहसंचालक ऊद्योग, संचालक हाफकीन बायो., अप्पर मुख्य सचिव गृह (अपिल) व अपर मुख्य सचिव, वैद्यकिय शिक्षण यासारख्या पदांवर काम केले आहे.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना मेधा गाडगीळ यांना सेवा ज्येष्ठतेनुसार राज्याच्या मुख सचिव होण्याची संधी होती. तसे झाले असते तर राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा मान मेधा गाडगीळ यांना मिळाला असता. परंतु, त्यांचे पती अनंत गाडगीळ हे काँग्रेसचे विधान परिषद सदस्य असल्याचे कारण देत, मेधा गाडगीळ यांना संधी नाकारण्यात आल्याची मंत्रालयात चर्चा होती.