गेली चार वर्षे एस.टी महामंडळातील (MSRTC) सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळी (Diwali) भेट देण्यात येते. यापूर्वी कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त रु.10,000/- अग्रिम देण्यात आला आहे. एस.टी. महामंडळात कार्यरत असणाऱ्या सुमारे 1 लाख 10 हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिवाळीनिमित्त अनुक्रमे रु.2,500/- व रु.5,000/- इतकी रक्कम दिवाळी भेट म्हणून देण्यात येणार आहे. आचारसंहिता (code of conduct) अद्यापही असल्याने याबाबतचा प्रस्ताव निवडणूक आयोगाच्या (Election Commission – ECU) मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. निवडणूक आयोगाची परवानगी मिळताच कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट (bonus) देण्यात येईल, अशी घोषणा परिवहन मंत्री तथा एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते (Diwakar Raote) यांनी केली आहे.

यासंदर्भात एस.टी.च्या अमळनेर (जळगांव) (Jalgaon) आगाराचे वाहक मनोहर पाटील यांनी रावते यांना दूरध्वनी करुन मागील चार वर्षाप्रमाणे यंदाही सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट देण्याविषयी विनंती केली होती. त्या विनंतीच्या अनुषंगाने रावते यांनी सर्व कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्याच्या दृष्टीने दिवाळी भेट देण्याचा निर्णय घेतला.

केंद्र व राज्य शासनाप्रमाणे देय असलेला 3 टक्के महागाई भत्ता 1 जानेवारी 2019 पासून देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यापैकी माहे ऑक्टोबरच्या वेतनामध्ये ही 3 टक्के महागाई भत्ता अदा करण्यात येत आहे. जानेवारी ते सप्टेंबर 2019 पर्यंतचा थकित महागाई भत्ता देण्याबाबतचा निर्णय यथावकाश घेण्यात येईल. त्यामुळे यंदाची दिवाळीही एस.टी कर्मचाऱ्यांना आनंदाची होणार आहे.

दिवाळीच्या सणानिमित्त प्रवाशांची वाढती गर्दी विचारात घेता एस.टी. महामंडळातर्फे दि. 24 ऑक्टोंबर ते 05 नोव्हेंबर या कालावधीत विविध विभागातून सुमारे 3,500 बसेस सोडण्यात येणार आहेत. या लांब पल्ल्याच्या जादा वाहतूकीबरोबरच स्थानिक स्तरावर आवश्यकतेनुसार जादा बसेस सोडण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत.

दि 25 ऑक्टोबर ते 05 नोव्हेंबरच्या दरम्यान एस.टी.ची 10 टक्के हंगामी दरवाढ करण्यात येणार आहे. एस.टी. महामंडळाच्या परिवर्तनशील भाडेवाढ सुत्रानुसार गर्दीच्या हंगामात महसुल वाढीच्या दृष्टीने 30 टक्क्यापर्यत हंगामी भाडेवाढ करण्याचा अधिकार राज्य परिवहन प्राधिकरणाने एस.टी.ला दिला असल्याने दरवर्षीप्रमाणे या हंगामातही 10 टक्के भाडेवाढ 24 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. ही भाडेवाढ 05 नोव्हेंबर 2019 पर्यंत राहील. ही भाडेवाढ साधी (परिवर्तन), निमआराम (हिरकणी) व शिवशाही (आसन) (Shivshahi) या बसेसला लागू राहील. ही भाडेवाढ शिवशाही (शयनयान), शिवनेरी (Shivneri) व अश्वमेध या बसेसला लागू होणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here