साथीच्या काळातही घरी राहणे ज्यांना “परवडणार” नाही अशांच्या घरी पोहोचवला मदतीचा, सहानुभूतीचा झरा

नॉवेल करोना विषाणूमुळे पसरत असलेल्या कोविड-१९ या रोगाची जगभरातील ४.९ लाख लोकांना लागण झाली असून आजवर २२,००० पेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडले आहेत. २७ मार्च २०२० रोजीच्या आकडेवारीनुसार एकट्या भारतात २७ राज्यांमधील कमीत कमी ६०० लोकांना संसर्ग झाला आहे आणि १७ लोकांचा बळी गेला आहे. गेल्या आठवड्यात भारतातील अनेक राज्यांनी सुरक्षेला प्राधान्य देत शाळा, महाविद्यालये, मॉल्स, थिएटर्स, रेस्टोरंटस, दुकाने आणि अत्यावश्यक नसलेली कार्यालये बंद ठेवत शक्य होईल तितक्या जास्त लोकांना घरून काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आता देशात २१ दिवसांचा लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे.

परंतु समाजात कितीतरी असे लोक आहेत जे आजही अथक मेहनत करून आपल्या सामाजिक गरजा पूर्ण करत आहेत. डॉक्टर्स, नर्सेस, डिलिव्हरी कर्मचारी, सफाई कर्मचारी, स्वयंसेवक आणि असे इतर लोक आपली व्यक्तिगत सुरक्षा धोक्यात घालून काम करत आहेत. करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या जगभरात वाढत आहे, त्यामुळे हेही लक्षात ठेवले पाहिजे की त्यांच्या जीवनात संपूर्णपणे चांगले बदल घडून आल्याखेरीज प्रत्येकजण क्वारंटाईनमध्ये राहू शकणार नाही. खास करून काबाडकष्ट करून रोजंदारीवर जगणाऱ्या कामगारांवर आणि त्यांच्या कुटुंबांवर या साथीचे दीर्घकालीन आर्थिक परिणाम होतील.

गेल्या रविवारी २२ मार्च २०२० रोजी मिलाप हा दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या क्राऊडफंडींग प्लॅटफॉर्म कोविड-१९ साठी फंडरेंजर्ससाठी खुला करण्यात आला. या साथीचा सर्वात वाईट परिणाम ज्यांच्या आयुष्यावर झाला आहे अशांच्या मदतीसाठी milaap.org/covid19 हे स्वतंत्र पेज सुरु करण्यात आले. मोठ्या शहरांमधील झोपडपट्ट्यांमध्ये जीवनावश्यक वस्तू पोहोचवण्यापासून डॉक्टर्सना/त्यांच्या सामाजिक उपक्रमांना बचावाचे साहित्य पुरवणे, छोट्या हॉस्पिटल्समध्ये व्हेन्टिलेटर्स पुरवणे अशा विविध कारणांचा यामध्ये समावेश आहे. लुईस मिरांडा आणि वेंकट अय्यर यासारख्या विख्यात लोकांनी फंडरेंजर्स सुरु केले आहेत तर दुसऱ्या बाजूला अनेक व्यक्ती त्यांच्या आजूबाजूच्या संकटात असलेल्या कुटुंबांसाठी फंड रेजिंग करत आहेत. जागतिक एकता घडून यावी यासाठी मिलापने या कारणांसाठी फंडरेजिंग करणाऱ्यांसाठी आपली प्लॅटफॉर्म फी पूर्णपणे रद्द केली आहे.

मिलापचे सीईओ आणि सह-संस्थापक श्री. मयूख चौधुरी यांनी सांगितले, “संकटात असलेल्या कुटुंबांना आर्थिक दिलासा मिळावा आणि जे प्रत्यक्ष काम करत आहेत त्यांना आवश्यक असलेली स्रोतसाधने देऊन मदत केली जावी यासाठी भारतात नागरिकांकडून केल्या जात असलेल्या प्रयत्नांना प्रसिद्धी मिळवून देणे हे क्राऊडफंडींग प्रोजेक्टचे उद्धिष्ट आहे. आपल्यापैकी प्रत्येकाने आपल्या आजूबाजूला, शेजारी बघावे, जे संकटात आहेत त्यांना मदत करावी यासाठी प्रेरणा देणे हा आमचा उद्देश आहे. वातावरण निवळण्यास वेळ लागेल पण मदतीचा, सहानुभूतीचा एक हात जीवन सुसह्य करेल.”

त्यांनी पुढे असेही सांगितले, “नैसर्गिक आपत्ती आणि संकटांच्या काळात आम्ही नेहमीच लोकांच्या मदतीला उभे असतो आता सुद्धा तीच परिस्थिती आहे. या डिजिटल काळात जेव्हा भौतिक साधने निष्प्रभ होतात तेव्हा देखील आपण एकमेकांची मदत करू शकतो. नागरिकांच्या पुढाकाराने केल्या जात असलेल्या फंडरेजिंग उपक्रमांसाठी अनेक दात्यांनी आमच्याशी संपर्क केला आहे. गेल्या दोन दिवसात जवळपास २००० दात्यांनी या कारणासाठी फंडरेजिंग करणाऱ्यांना सहकार्य केले असून ही संख्या सातत्याने वाढत आहे. एवढ्या मोठ्या संकटाचा मुकाबला यशस्वीपणे करण्याचा एकमेव उपाय आहे एकजूट, म्हणूनच मिलाप लोकांना एकमेकांची मदत करण्यात सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. आमच्या बाजूने आम्ही आमचा प्लॅटफॉर्म संपूर्णपणे मोफत उपलब्ध करवून देत आहोत, जेणेकरून गरजू लोकांना मदत मिळू शकेल.”

मिलाप हा क्राऊडफंडिंग प्लॅटफॉर्म जास्त करून व्यक्तिगत वैद्यकीय कारणांसाठी वापरला जातो, आजवर ४०००० पेक्षा जास्त दात्यांकडून या प्लॅटफॉर्ममार्फत १० करोड जमा केले गेले आहेत. यामध्ये चेन्नई, आसाम, केरळ येथील आणीबाणी आणि नैसर्गिक आपत्तीच्या काळातील फंडरेजिंगचा समावेश आहे. या प्लॅटफॉर्मवर फक्त भारतातील कारणांसाठी फंडरेजिंग केले जाऊ शकते पण फंडरेंजर्सना जगभरातून मदत येऊ शकते.

यामध्ये सहभागी होण्याचे तीन मार्ग आहेत
१. milaap.org/covid19 याठिकाणी यादी आहे त्यातील कोणत्याही कॅम्पेनसाठी डोनेशन देऊ शकता.
२. संकटात असलेल्या एखाद्या व्यक्तीसाठी तुम्ही स्वतः फंडरेजर सुरु करू शकता. एखादी व्यक्ती (उदा. तुमच्या घरी काम करणारी व्यक्ती, ऑफिसमधील सहकारी) किंवा सामाजिक उपक्रम (स्थानिक हॉटेल, शालेय आहार योजना) यांच्यासाठी फंडरेजिंग केले जाऊ शकते. तुमच्या मित्रांना, शेजाऱ्यांना, सहकाऱ्यांना योगदान देण्यास सांगा. फंडरेजिंग मोफत आहे, मिळालेल्या डोनेशन्सवर कोणतेही शुल्क नाही.
३. प्रेरित व्हा, संकटात असलेल्या एखाद्या कुटुंबासाठी तुमच्या सर्कलमध्ये फंडरेजिंग करा (कुटूंबीय/शेजारी)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here