@maharashtracity

भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांचा मावळ येथे आरोप

मावळ (पुणे): पीएमआरडीएच्या प्रस्तावित विकास आराखड्यात (proposed DP of PMRDA) मावळ मधील शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधात आरक्षणे टाकून आणि नामधारी शेतकरी “विकासकांची” आरक्षणे निवासी पट्टा म्हणून खुली करण्याचा डाव सुरु असून यात 1 हजार कोटींचा घोटाळा करण्यात येतोय, असा गंभीर आरोप भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार (BJP MLA Ashish Shelar alleged corruption in PMRDA DP) यांनी मावळ येथे केला.

कामशेत, मावळ येथे समर्थ बुथ अभियान कार्यकर्ता मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थितीत राहून आमदार अँड आशिष शेलार यांनी संवाद साधला.

शेलार म्हणाले, शेतजमिनी, शेतघरे याची आरक्षणे बदलून शेतकऱ्यांना मारक ठरतील आणि अल्पभूधारक शेतकरी उध्वस्त होईल अशी आरक्षणे टाकली जात आहेत. एका शेतकरी परिवाराची अंदाजे 1 हजार एकर शेतजमीन निवासी म्हणून कशी खुली करण्यात आली? हा सगळा दहा हजार कोटीचा मामला आहे. या आराखड्यात 1 हजार कोटीचा घोटाळा असल्याचा आरोप त्यांनी केला.

महाविकास आघाडीतील तीन पक्षात आपसांत रोज लढाई लागलेली आहे. त्यातील दोन पक्षांचे जे संकेत मिळत आहेत, या सर्वांचा अभ्यास केला तर असे अनुमान काढता येईल की, राज्यात कधीही निवडणूक लागू शकतात. त्यामुळे जेव्हा केव्हा निवडणूका लागतील तेव्हा मावळमध्ये भाजपाचा आमदार निवडून आणायचा आहे, अशा तयारीला लागा असे कार्यकर्त्यांना सांगितले.

एम पी एस सी (MPSC) ची तयारी करणाऱ्या स्वप्निल लोणकरने आत्महत्या Swapnil Lonkar committed suicide) केल्यानंतर या विद्यार्थ्याला विधानसभेत ठाकरे सरकारने (Thackeray Sarkar) श्रध्दांजली वाहताना दिलेले आश्वासन सुध्दा पुर्ण करु शकले नाहीत. ही बाब दुर्दैवी असून सरळ सेवा भरतीसाठी रिक्त पदांची माहितीच सामान्य प्रशासन विभागाकडे गोळा झाली नाही. दिलेली मुदत 30 सप्टेंबरला संपली, यावरुन तरुणांच्या विषयात सरकार किती गंभीर आहे हे दिसते, असेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here