By सदानंद खोपकर

@maharashtracity

मुंबई: विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आरोप केलेले विशेष सरकारी अधिवक्ता प्रवीण चव्हाण (Pravin Chavan) फरार झाल्याचा दावा विरोधी पक्षाकडून केला जात आहे. मात्र, चव्हाण यांनी तातडीने प्रसारमाध्यमांसमोर येत स्वतःची बाजू मांडून देवेंद्र फडणवीस यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले‌ आहेत.

प्रवीण चव्हाण म्हणाले, सरकार माझे नाही. मी सरकारमध्ये सहभागी नाही. माझ्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याचा राजकारणाशी संबंध नाही. माझ्या संपूर्ण कार्यकाळात मी कोणतीही निवडणूक लढवलेली नाही. त्यामुळे सरकारशी माझा संबंध असण्याचा प्रश्‍नच येत नाही.

देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही. मी फक्त कार्यालयात बसलेला दिसत आहे. कार्यालयामधील कुठल्यातरी व्यक्तीला मॅनेज करून व्हिडिओ चित्रित केला असावा. या व्हिडिओत फेरफार करण्यात आले आहेत, असा दावा प्रवीण चव्हाण यांनी केला. ते म्हणाले, हे फेरफार कधी ना कधी बाहेर येतीलच. केंद्रीय अन्वषेण विभाग (CBI) किंवा कोणती चौकशी करायची हे मी ठरवत नाही, तर सरकार ठरवते, असेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here