शिवसेनेचे माजी आमदार शरद पाटील यांचा प्रवेश निश्चित

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) आणि पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी कानावर हात ठेवले असले तरी भारतीय जनता पक्षाचे (BJP) ज्येष्ठ परंतु, दुर्लक्षित नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेश निश्चित झाला आहे. मात्र, खडसे यांना कृषी (Agriculture ministry) मंत्रिपद हवे आहे, तर शिवसेना (Shiv Sena) हे खाते सोडायला तयार नाही. म्हणून खडसे यांच्या पक्ष प्रवेशाचा मुहूर्त लांबला आहे.

दरम्यान, शिवसेनेचे धुळे (Dhule) ग्रामीणचे माजी आमदार प्रा शरद पाटील (Sharad Patil) हे दि २२ रोजी जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री (Dy CM) अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत मुंबईत (Mumbai) राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हाताला बांधतील.

भाजपच्या स्थापनेपासून पक्ष वाढीसाठी आयुष्य वेचलेल्या एकनाथ खडसे यांना पक्षाने एमआयडीसी (MIDC) जमीन गैरव्यवहाराच्या (land scam) आरोपानंतर मंत्रिपद सोडायला सांगितले आणि तिथून खडसे यांचे राजकीय खच्चीकरण करण्यात आले. पक्षाने खडसे यांना २०१९ मध्ये विधानसभा (Assembly) निवडणुकीत (election) तिकीट नाकारले. त्यांच्याऐवजी रोहिणी (Rohini) या त्यांच्या मुलीला पक्षाने तिकीट दिले, पण ती निवडून येणार नाही, याचा ‘बंदोबस्त’ केला, आणि तिला पराभूत केले, असा दावा खडसे समर्थक आणि खुद्द खडसे यांनी वारंवार केला आहे.

भाजपने पराभूत उमेदवार पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि तिकीट नाकारलेले विनोद तावडे (Vinod Tawde) यांना पक्षात राष्ट्रीय स्तरावरील पद देऊन पुनर्वसनाची संधी दिली. परंतु, खडसे यांना ती ही संधी नाकारल्याने ‘कितीही अन्याय झाला तरी ज्या पक्षाला वाढवले आहे, तो कधीही सोडणार नाही’, असे म्हणणाऱ्या खडसे यांनी अखेर भाजपला रामराम करण्याचा निर्णय घेतला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना खडसे यांच्या पक्ष प्रवेशाबाबत विचारले असता, आपल्याला याबाबत काही माहिती नाही, असे पाटील यांनी सांगितले. “पवार साहेब आणि खडसे यांची भेट झाली की नाही याची मला कल्पना नाही. खडसे पक्ष प्रवेश करणार आहेत की नाही हे देखील मला माहित नाही,” पाटील म्हणाले.

Also Read: सरकारी एस टी तोट्यात, अन खाजगी बस मालकांना हवीय ८०० कोटींची कर माफी

पक्ष प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले, “अजून ठरायचे आहे. तारीख निश्चित नाही. खडसे एकटे राष्ट्रवादीत येतील की त्यांच्या सोबत अन्य कोणी असतील, हे अजून ठरलेले नाही.”

राष्ट्रवादीतील अन्य नेत्याने सांगितले की, खडसे यांना पक्षात प्रवेश देऊन मंत्रिपद दिले जाणार आहे. त्यांना कृषी खाते हवे आहे, तर सेना हे खाते सोडण्यास तयार नाही. “महाविकास आघाडी सरकार बनवतांना शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस (Congress) यांच्यात खाते वाटप करतांना कृषी खाते सेनेच्या वाट्याला आले. दादा भुसे (Dada Bhuse) हे या खात्याचे मंत्री आहेत. हेच खाते हवे असेल तर खडसे यांनी शिवसेनेत प्रवेश करावा, अशी गळ घातली आहे. परंतु, खडसे यांनी त्यास नकार दिला आहे,” असे या सूत्राने सांगितले.

रोहिणी एकनाथ खडसे यांचा मुक्ताईनगर (Muktainagar) या बालेकिल्ल्यात पराभव करणारे अपक्ष चंद्रकांत निंबा पाटील (Chandrakant Patil) यांनी आमदार होताच शिवसेनेला पाठिंबा दिला. पाटील हे मुळात सेनेचे. विधानसभा निवडणुकीपर्यंत सेनेचे जिल्हाप्रमुख होते. रोहिणी खडसे यांच्याविरोधात बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवली. राष्ट्रवादीच्या सहकार्याने अपक्ष म्हणून निवडून आले आणि खडसे यांचा पारंपरिक मतदार संघ भाजपकडून हिरावून घेतला.

एकनाथ खडसे यांनी १९८९ पासून सलग सहा वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. खडसे यांना मुलीचा पराभव जिव्हारी लागला आहे. पुढील निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांना पराभूत करण्याचा खडसे यांचा निर्धार आहे. म्हणूनच खडसे सेनेत जाण्यास तयार नाहीत.

कृषी खाते मिळणार नसेल तर अन्य कुठल्या खात्यावर तडाजोड करावी याचा निर्णय कार्यकर्त्यांशी बोलून घेऊ असे खडसे यांनी राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला कळवले आहे. त्यामुळेच खडसे यांचा पक्ष प्रवेशाचा मुहूर्त लांबला असल्याचे सांगितले जात आहे.

सेनेचे शरद पाटील राष्ट्रवादीत जाणार

कॉग्रेसचे मातब्बर नेते रोहिदास पाटील (Rohidas Patil) यांना २००९ च्या विधानसभा निवडणुकीत धुळे (Dhule) ग्रामीण मतदारसंघात पराभूत करून जायंट किलर (Giant Killer) ठरलेले शिवसेनेचे प्रा शरद पाटील २०१४ मध्ये रोहिदास पाटील यांचे सुपुत्र कुणाल पाटील (Kunal Patil) यांच्याकडून पराभूत झाले. त्यानंतर प्रा पाटील सेनेकडून दुर्लक्षित राहिले. २०१९ मध्ये त्यांना तिकीट नाकारण्यात आल्यानंतर पाटील यांनी सेनेला जय महाराष्ट्र केला. गेले वर्षभर पाटील कुठल्याही पक्षात नसल्याने त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश निश्चित झाल्याचे समजते. प्रा पाटील यांनी या माहितीस दुजोरा दिला असून येत्या २२ तारखेला मुंबईत पक्ष प्रवेश होणार आहे, अशी माहिती दिली.

प्रा. पाटील म्हणाले, “ऐन निवडणूक काळात मोठया भावाचे निधन झाले. प्रचाराला जाऊ शकलो नाही. परंतु, पक्षाकडून विचारणा झाली नाही. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), जे पूर्वी सतत संपर्कात असायचे, त्यांनीही दुर्लक्ष केले. त्यामुळे पक्ष सोडला.”

संपूर्ण धुळे जिल्हा राष्ट्रवादीमय करू, असा दावा प्रा पाटील यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here