Twitter : @ManeMilind70

मुंबई: राज्यात रविवारी झालेल्या राजकीय भूकंपानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडखोरी (rebel in NCP) केलेले अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा घेतल्यानंतर त्यांच्याकडे आलेले आमदार पुन्हा फुटून शरद पवार (Sharad Pawar) यांच्या गटात जाऊ नये, या भीतीपोटी या आमदारांना मुंबईतील ताज लँड या हॉटेलमध्ये सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आल्याची माहिती प्राप्त होत आहे. 

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंडखोरी केल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ असणारे आमदार हे कधीही शरद पवारांच्या गोटात सामील होऊ शकतात, याची कुणकुण अजित पवार यांना आहे. तसेच 2019 च्या वेळी उपमुख्यमंत्री पदाची शपथ देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर घेतल्यानंतर बरोबर असलेले आमदार पुन्हा शरद पवारांनी केलेल्या धूर्त खेळीमुळे राष्ट्रवादीत गेले होते. त्यामुळे अजित पवारांना राजीनामा देऊन शरद पवारांच्या आश्रयाला यायला लागले होते.  ती चूक पुन्हा होऊ नये यासाठी त्यांना समर्थन देणाऱ्या सर्व आमदारांना मुंबईतील ताज लँड या हॉटेलमध्ये सुरक्षा व्यवस्थित ठेवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. 

अजित पवार यांना समर्थन देणाऱ्या आमदारांची नावे पुढील प्रमाणे

1) छगन भुजबळ -(येवला)
2) दिलीप वळसे पाटील (आंबेगाव)
3) हसन मुश्रीफ (कागल)
4) धनंजय मुंडे (परळी)
5) आदिती तटकरे (श्रीवर्धन)
6) धर्मराव बाबा आत्राम (अहेरी)
7) संजय बनसोडे (उदगीर लातूर)
8) अनिल पाटील (अमळनेर)
9) बाळासाहेब आजबे (आष्टी)
10) राजू कारेमोरे (तुमसर)
11) माणिकराव कोकाटे (सिन्नर)
12) मनोहर चंद्रिकापुरे (अर्जुनी मोरगाव)
13) दीपक चव्हाण (फलटण)
14) संग्राम जगताप (अहमदनगर शहर)
15) नरहरी झिरवळ (दिंडोरी)
16) सुनील टिंगरे (वडगाव शेरी)
17) इंद्रनील नाईक (पुसद)
18) शेखर निकम (चिपळूण)
19) नितीन पवार (कळवण)
20) बाबासाहेब पाटील (अहमदपूर)
21) राजेश पाटील (चंदगड)
22) दिलीप बनकर (निफाड)
23) अण्णा बनसोडे (पिंपरी)
24) अतुल बेनके (जुन्नर)
25) दत्तात्रय भरणे (इंदापूर)
26) यशवंत माने (मोहोळ)
27) दिलीप मोहिते (खेड आळंदी)
28) निलेश लंके (पारनेर)
29) बबनराव शिंदे (माढा)
30). सुनील अण्णा शेळके (मावळ)
31) प्रकाश सोळंके (माजलगाव बीड)
32) देवेंद्र भुयार (मोर्शी) हे अपक्ष आमदार असून यांचे अजित पवार यांना समर्थन आहे. 

या अजित पवार समर्थक आमदारांना मुंबईतील ताज लँड या आलिशान हॉटेलमध्ये सुरक्षित व सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आले असून जोपर्यंत सरकार स्थिरावत नाही, तोपर्यंत या आमदारांची आता हॉटेलमधून सुटका होणार नाही, असे सांगण्यात येत आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here