@maharashtracity

By अनंत नलावडे

मुंबई: पुणे- नाशिक हायस्पीड रेल्वे (Pune – Nasik High Speed Railway project) या प्रकल्पाची सर्व स्तरावरील रेल्वे अधिकाऱ्यांकडून मंजूरी मिळाली असून रेल्वे बोर्डाचे चेअरमन यांचीही मंजूरी मिळालेली आहे. केंद्रीय मंत्री मंडळाची मान्यता तात्काळ मिळण्यासाठी आपण पाठपुरावा करावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली आहे. पवार यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेऊन ही मागणी केली.

पवार यांनी केलेल्या अन्य मागण्या याप्रमाणे, आशा सेविकांना किमान वेतन (minimum wages to Asha workers) लागू करावे, राज्यातील विकास कामांवरील स्थगिती उठवावी. त्यात प्रामुख्याने ग्रामविकास विभागाच्या १२ ऑक्टोबर, २०२२ च्या शासन निर्णयान्वये लेखाशिर्ष २५१५, १२३८ खाली लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावातंर्गत मुलभूत सुविधा पुरविणे या लेखाशिर्षातंर्गत १ एप्रिल, २०२१ पासून मंजूर कामे रद्द करण्यात आली आहेत. वास्तविकता ही कामे नियमाधिन व प्राधान्याची असल्याने ती रद्द केल्यास राज्यातील विकास कामांना खिळ बसू शकते. त्यामुळे विकास कामांवरील स्थगिती तातडीने उठवावी, अशी मागणी पवार यांनी केली.

अहमदनगर येथील बर्डे कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी, उल्हास नदीवरील पूर नियंत्रण रेषा संदर्भांत सर्वसामान्यांना विचारात घ्यावे, विना अनुदानित शाळांचा प्रश्न सोडवावा आणि सत्ताधारी लोकप्रतिनिधींडून शासकीय अधिकाऱ्यांना दमदाटीचे होत असलेले वाढते प्रकार पाहता याबाबत ठोस निर्णय घ्यावा, असेही पवार यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या मागणी पत्रात नमूद केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here