युतीला जनतेचा स्पष्ट कौल
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रतिपादन
@maharashtracity
नागपूर: ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांनी भारतीय जनता पार्टी – शिवसेना युतीला (BJP – Shiv Sena Alliance) स्पष्ट कौल दिला असून ५८१ पैकी २९९ ग्रामपंचायतीमध्ये युतीचे सरपंच निवडून आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde):व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर जनतेने या निकालाद्वारे विश्वास व्यक्त केला असून आपण दोन्ही नेत्याचे अभिनंदन करतो, असे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawabkule) यांनी सोमवारी नागपूर येथे पत्रकारांना सागितले.
बावनकुळे म्हणाले की, राज्यात मतदान झालेल्या ग्रामपचायतींपैकी ५८१ च्या निकालाची माहिती उपलब्ध झाली असून भारतीय जनता पार्टीचे सरपंच २५९ ठिकाणी निवडून आले आहेत. या निवडणुकीतही भाजपा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे सरपंच ४० ठिकाणी निवडून आले आहेत. दोन्हींचा एकत्रित विचार करता पन्नास टक्क्यापेक्षा अधिक ग्रामपंचायतीमध्ये युतीचे सरपंच लोकानी निवडून दिले आहेत. या कौलाबद्दल आपण मतदारांचे आभार मानतो आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो.
राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालावरून नव्या सरकारच्या बुलेट ट्रेनने महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) ऑटो रिक्षावर मात केल्याचे स्पष्ट झाल्याचे आहे. बुलेट ट्रेन सुसाट निघाली आहे, असेही ते म्हणाले.
जनतेचे शिक्कामर्तब
जनतेतून थेट निवडून दिलेला सरपंच हा संपूर्ण गावाला उत्तरदायी असतो. त्या दृष्टीने शिंदे फडणवीस सरकारने सरपंचाची थेट निवड करण्याचा निर्णय घेतला होता, त्यावरही जनतेने या निकालाद्वारे शिक्कामोर्तब केले आहे.