भाजप आमदार अमित साटम यांचा आरोप

@maharashtracity

मुंबई: प्रकल्पबधितांसाठी (PAP) बांधकाम व्यावसायिकांकडून (Builder) मुंबई महापालिका (BMC) अव्वाच्या सव्वा दराने सदनिका विकत घेतल्या जात आहेत. यात आदित्य सेनेने टक्केवारीवर लक्ष केंद्रित करून विशिष्ट बिल्डरला जवळपास 600 कोटींचा फायदा करून देण्याचा प्रस्ताव सुधार समिती (Improvement Committee) बैठकीत आणला असल्याचा घणाघाती आरोप भाजपचे आमदार अमित साटम (BJP MLA Amit Satam) यांनी केला आहे.

साटम म्हणाले की मुंबई महानगर पालिकेत आदित्य सेनेने (Aaditya Sena) जणू काही भ्रष्टाचाराचा वर्ल्ड रेकॅार्ड करायचे ठरवले आहे. “या सेनेने सुधार समितीच्या बैठकीत प्रकल्पबाधितांसाठी एक प्रस्ताव आणला आहे. त्यात तीनशे चौरस फुटाची सदनिका तब्बल एक कोटी सत्तावन लाख रूपये या किमतीत म्हणजेच ५२ हजार प्रति चौरसफुट या दराने ५२९ सदनिका घ्यायचे ठरवले आहे,” असे साटम यांनी निदर्शनास आणून दिले.

ते म्हणाले की, साधारणतः आजपर्यंत सरासरी प्रत्येकी १७ लाख रूपये या किमतीत सदनिका विकत घेतल्या जात असत. पण सगळे पायंडे पायदळी तुडवत टक्केवारीसाठी बिल्डरला ६०० कोटी रुपयांचा फायदा करून दिला जातोय, असा आरोप अमित साटम यांनी केला.

“पण आम्ही मुंबईकरांच्या कराचा पैसा बिल्डरांच्या घशात जाऊ देणार नाही, त्यासाठी संपूर्ण न्यायालयीन लढाई लढू,” अशा शब्दात साटम यांनी आदित्य सेनेला इशारा दिला आहे.

बिल्डरांसोबत (Developer) भागीदारी करून महापालिकेच्या तिजोरीवर दिवसा ढवळ्या दरोडा घालायचा आणि इनकम टॅक्स (Income Tax) विभागाने कारवाई केली की मराठीद्रोही, महाराष्ट्रद्रोही म्हणून उलट्या बोंबा मारायच्या, अशीही टीका साटम यांनी शिवसेनेचे (Shiv Sena) नाव न घेता केली.

तुमचा हा ढोंगीपणा आता सर्व मुंबईकरांना (Mumbaikar) कळाला आहे, असे साटम म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here