@maharashtracity

मुंबई : ओबीसी समाजाचे हक्काचे आरक्षण मिळून देण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चातर्फे गुरुवारी राज्यभर आक्रोश आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारने तातडीने मागासवर्ग आयोगाची स्थापना करावी आणि ओबीसी समाजाच्या लोकसंख्येविषयी जिल्हानिहाय सर्वेक्षण करून अहवालाच्या आधारावर आरक्षण वाचविण्यासाठी तातडीने हालचाल करावी यासह एवढ्या गंभीर प्रकरणात निष्काळजीपणा करणारे ओबीसी मंत्रालयाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी या आंदोलनातून करण्यात आली.

मुंबई येथे भाजपा प्रदेश कार्यालया जवळ प्रदेश उपाध्यक्ष आ. संजय कुटे व ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. ‘ओबीसी समाजाच्‍या हक्‍कासाठी भाजपाचा लढा सुरूच राहणार’ असे प्रतिपादन करत आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी चंद्रपूर येथे आंदोलनाचे नेतृत्व केले.

पुणे येथे प्रदेश महिला मोर्चा अध्यक्षा उमा खापरे व जिल्हाध्यक्ष जगदिश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आले. नाशिक येथे खा. भारती पवार, आ. सीमा हिरे, जिल्हाध्यक्ष गिरीश पालवे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. तर धुळे येथे आ. गिरीष महाजन यांनीही या आंदोलनात सहभाग घेतला. नाशिक येथे राज्य मागासवर्गीय आयोगाचे लवकरात लवकर गठण करून ओबिसी समाजाला त्यांच्या हक्काचे आरक्षण पुन्हा मिळवून द्यावे अशा आशयाचे निवेदन ही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आ. प्रविण दटके, आ.कृष्णा खोपडे, आ. रणधिर सावरकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग घेत महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणाचा निषेध नोंदवला. ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी ठाकरे सरकारने गांभीर्याने हे प्रकरण हाताळावे. त्यासाठी तातडीने मागासवर्गीय आयोगाची स्थापना करावी, असे निवेदन ही ठिकठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

( मुकुंद कुलकर्णी )
कार्यालय सचिव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here