@maharashtracity

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयातील मलीन कपडे धुण्यासाठी अत्याधुनिक धुलाई यंत्राची आराखडा अर्थात टलेन लाँड्री यंत्र खरेदीत मोठा गैरव्यवहार होत असल्याचा आरोप करून या व्यवहारात गुंतलेल्या ठेकेदार आणि पालिकेतील सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल पाठीशी घालत आहेत, असा आरोप भाजपचे आमदार अमित साटम यांनी केला आहे.

यासंदर्भात आयुक्त यांना पाठवलेल्या पत्रात साटम यांनी नमूद केले आहे की, त्यांनी सबंधित कंत्राटात होत असलेल्या संशयास्पद व अनेक नियम धाब्यावर बसवून उघड उघड चाललेला भ्रष्ट कारभार आयुक्त यांच्या निदर्शनास आणून दिला होता. परंतु ज्या पद्धतीने आयुक्तांकडून कोणताही थेट प्रतिसाद न मिळाता प्रमुख अभियंतामार्फत अत्यंत चलाख व सारवासारव करणारे उत्तर मिळाले, ते अतिशय धक्कादायक आहे.

जिथं एवढ्या मोठ्या प्रमाणात जनतेच्या कराचा पैसा लागलेला आहे तिथे पारदर्शकतेचा अभाव व नियमांची पायमल्ली होत असेल तर आपल्यावरही कुणाचा तरी राजकीय दबाव आहे का? अशी शंका येतेय, असे साटम आयुक्तांना उद्देशून म्हणाले.

हे कंत्राट फक्त टनेल लाँड्री बनविण्यासाठी नसून तर टक्केवारीसाठी आपले हात धुवून घेण्यासाठीच काढले आहे का? मला मिळालेले प्रमुख अभियंत्याचे उत्तर निव्वळ धूळपेक करणारे आहेच. परंतु या पत्राचा सर्व खटाटोप कंत्राटदाराला वाचविण्यासाठीच होता. यामुळे महापालिका प्रशासनाची टक्केवारीसाठी चाललेली केविलवाणी परिस्थिती व अवस्था जनतेसमोर ऊघडी पडली आहे, असे साटम म्हणाले.

आयुक्त यांनी खालील सर्व प्रश्नांची उत्तर देणं अपेक्षित आहे, असे नमूद करून साटम यांनी प्रश्नाची यादी दिली आहे.

नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि निविदा मूल्य पाहता संबंधित विभागाने हा प्रकल्प यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी पुरेसा अभ्यास केला असेल आणि तज्ञांचे मत घेतले असेल. निविदा दस्तऐवज काळजीपूर्वक पाहिल्यानंतर, संबंधित विभागाकडून खालील मुद्द्यांवर स्पष्टीकरणे द्यावीत, अशी मागणी साटम यांनी केली आहे.

  1. बॅच वॉशिंग संकल्पनेबाबत यांत्रिकी विभागाने सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानावर काही सर्वेक्षण केले आहे का? हे तंत्रज्ञान लागू करण्यासाठी संबंधित विभागाने laundry तज्ञांचा सल्ला घेतला आहे का? जर असेल तर कृपया बाजार सर्वेक्षण आणि तंत्रज्ञानावरील तज्ञ निष्कर्ष प्रदान करा. तसेच तज्ञ किंवा फर्म नियुक्त करण्यासाठी कोणती प्रक्रिया अवलंबली गेली याचा तपशील द्यावा.

महानगरपालिकेचे एक माजी वरिष्ठ अधिकारी ह्या निविदेमध्ये Tunnel Laundry संदर्भातील Technical Expert म्हणून कंत्राटदाराला साह्य करत आहे. महानगरपालिकेमधील सेवेमध्ये असताना त्या अधिकाऱ्यास या निवेदेमधील सर्व बारकावे माहिती होते आणि त्या सर्व गोपनीय माहितीचा वापर आणि फायदा आता ते पूर्णपणे संबंधित कंत्राटदाराला करून देत आहेt, असा दावा साटम यांनी केला आहे.

  1. निविदेत दिलेल्या तांत्रिक वैशिष्ट्यांना (Technical Specifications) अंतिम रूप देण्यासाठी कोणत्या वेगवेगळ्या Tunnel Laundry उत्पादन कंपनीच्या तांत्रिक वैशिष्ट्यांचा वापर करण्यात आला? कृपया यासंबंधी विभागाद्वारे केलेल्या उत्पादन / बोली लावणाऱ्या कंपन्यांना केलेले सर्व संप्रेषण (communication) देण्यात यावे.
  2. संबंधित निविदेचा अंतिम अंदाज (Financial Estimate) कसा काढला गेला? निविदेत नमूद केलेल्या कामासाठी निविदेचा अंतिम अंदाज तयार करण्यासाठी विचारात घेतलेल्या अंदाजपत्रकीय ऑफरचा तपशील देण्यात यावा.

• Supply, Installation, Testing and Commissioning of Tunnel Washer
• Supply, Installation, Testing and Commissioning Boiler
• Supply, Installation, Testing and Commissioning ETP
• Supply, Installation, Testing and Commissioning WTP
• Civil Works including P.E.B Works, Ancillary Works, and Supply of Office Furniture, Computers etc.
• Mechanical and Electrical works such as Electrical Network, PNG Network, SITC of Fire Fighting Equipment’s, SITC of CCTV System etc.
• Operations & Consumable for seven years.
• Comprehensive service maintenance contract for six years.

  1. निविदेच्या पात्रता निकषांमध्ये, कलम 2(अ) अन्वये असे नमूद करण्यात आले आहे की “The tenderer(s) / bidder in their own name should have satisfactorily executed the work of similar nature in each category of similar works as mentioned herein below in MCGM /Semi Govt./Govt. & Public Sector Organizations in India or public & private organizations/firms/ companies in Abroad during last seven (7) years ending last day of month previous to the one in which bids are invited as a prime Contractor”.

MCGM आणि CVC मार्गदर्शक तत्त्वांनुसार, फक्त MCGM/निमशासकीय/सरकारच्या अनुभवाचा विचार करणे आवश्यक आहे आणि सार्वजनिक क्षेत्रातील संस्था या प्रकरणात “India or public & private organizations/firms/ companies in Abroad” असा उल्लेख केला होता. हे कलम मोडीत काढण्यासाठी विभागाने संबंधित सक्षम अधिकाऱ्याकडून या विचलनाची परवानगी घेतली होती का? कृपया त्याचा तपशील द्या.

  1. निविदेत विचारण्यात आलेला कामाचा अनुभव “Mechanical & Electrical works such as, Fire fighting, Air Conditioning, or any major Plant & Machinery works”. त्यात Tunnel Laundry बसवण्यासंबंधी किंवा Laundry उद्योगाशी संबंधित कामाचा उल्लेख नाही. या निविदेसाठी केवळ बोली लावू शकणार्‍या काही कंपन्यांच्या बाजूने कामाच्या अनुभवाची ही आवश्यकता तयार करण्यात आली होती का?
  2. पात्रता निकषाच्या कलम 2 अन्वये उपविभाग 2 सह. (b) PEB आणि सिव्हिल कामासाठी, अनुभव फक्त ” i.e PEB, major fabrication works “ विचारण्यात आला होता, कोठेही कोणत्याही सिव्हिल संबंधित कामाच्या अनुभवाचा उल्लेख केलेला नाही. तसेच आमचा असा विश्वास आहे की PEB आणि Civil कामाचे मूल्य संपूर्ण निविदा मूल्याच्या 20% पेक्षा जास्त नाही, मग या कामाशी संबंधित स्वतंत्र अनुभव विचारण्याची गरज का आहे.
  3. निविदा अट सांगते की, if the bidder does not have experience in the works mentioned in 2(a) and 2(b), can upload Memorandum of Understanding (MOU) (duly notarized on Rs.500/- stamp paper) with the firm/organization having experience in execution of similar works and should satisfy the relevant criteria of 2(a) & 2(b) above.

बोली लावणाऱ्याला अशी सवलत का दिली जाते? जर MOU होणार असेल तर तो एकाच पक्षासोबत असेल किंवा वेगवेगळ्या पक्षांनाही त्यात सहभागी करून घेता येईल. निविदेत कुठेही स्पष्ट समज देऊन उल्लेख केलेला नाही. एवढ्या मोठ्या किमतीच्या निविदेत अशा प्रकारची सवलत दिल्याने ही निविदा स्पष्टपणे दिसून येते फक्त या निविदेसाठी बोली लावू शकणार्‍या काही कंपन्यांना ठेवण्यासाठी आणि त्यांच्या बाजूने तयार करण्यात आले होते.

  1. आर्थिक क्षमता मध्ये असे नमूद केले आहे की “Financial Capacity Bidder / MOU partner should achieve an average annual financial turnover as certified by ‘Chartered Accountant’ equal to Rs. 48.00 Cr. Of work in last three (3) financial years immediately preceding the Financial Year in which bids are invited.

उलाढालीच्या निकषांसाठी MOU भागीदार असण्यामागील तर्क विभाग स्पष्ट करू शकतो का? जर कंपनीकडे MCGM आणि CVC च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार उलाढाल होत नसेल, तर ती कंपनी या निविदेसाठी स्पर्धा करण्यास आणि इतके मोठे काम करण्यास सक्षम आहे का? या निविदेसाठी बोली लावू शकणार्‍या काही कंपन्यांना पसंती देण्यासाठी हा विशिष्ट निकष देखील लक्षात ठेवला आहे.

  1. जर आपण कलम 2(अ) अंतर्गत आवश्यक असलेल्या कामाच्या अनुभवाच्या निकषांकडे बारकाईने पाहिले तर असे नमूद केले आहे की “during last seven (7) years ending last day of month previous to the one in which bids are invited as a prime Contractor.”
    आणि
    आर्थिक क्षमता निकष:
    Bidder / MOU partner should achieve an average annual financial turnover as certified by ‘Chartered Accountant’ equal to Rs. 48.00 Cr. Of work in last three (3) financial years immediately preceding the Financial Year in which bids are invited.

कामाच्या अनुभवाचे निकष आणि उलाढालीच्या निकषांचे विश्लेषण केल्यानंतर, या निविदेसाठी पात्र ठरू शकतील अशा काही कंपन्यांच्या बाजूने या अटी तयार केल्या गेल्या.
The requirement of Work Experience is from the last day of month previous to the bid are invited and for Financial turnover criteria is required from the last 3 Years immediately preceding the Financial Years in which bids are invited – Why such kind of deviations in the tender for having Work Experience and Financial Turnover are different? This shows the tender was drafted in favoring few companies who can ONLY bid for this tender.

निविदेमध्ये आढळणाऱ्या या सर्व विसंगती आणि विचलन पाहता, हे स्पष्टपणे दिसून येते की या निविदाने कोणत्याही MCGM SBD मार्गदर्शक तत्त्वांचे तसेच CVC मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले नाही. संबंधित विभागाने या विषयाचा सविस्तर अभ्यास केलेला नाही आणि निविदा मसुदा तयार केला आहे जो केवळ निविदेत भाग घेण्यास पात्र ठरू शकणार्‍या काही कंत्राटदार कंपन्यांना पसंती देईल. म्हणून मला ठाम विश्वास आहे की विभागाने ही निविदा मोजक्या कंपन्यांच्या बाजूने तयार केली आहे, असा आरोप भाजप आमदार अमित साटम यांनी केला आहे.

​संबंधित निविदेचे Commercial Packet उघडण्यात आले आहे. त्यामध्ये खालील कंपन्यांनी निवेदेवर बोली लावली होती.

L1 – PARICHAY DEPARTMENT STORES PVT LTD
Vendor Code – 18493
संबधीत कंपनी ही एक डिपार्टमेंट स्टोर असून ह्या कंपनीला कुठलाही प्रकारचा यांत्रिक संबधीत अनुभव नाही आहे. ह्या कंपनीची वार्षिक उलाढाल सुद्धा निवेदेमध्ये नमूद केल्यानुसार ४८ करोड पेक्षा कमी आहे. विरोधी पक्षनेते माननीय देवेंद्र फडणवीस ह्यांनी विधानसभेमध्ये या बोगस कंपनीचा पर्दापाश केला होता. महानगरपालिका कसे काय एका डिपार्टमेंट स्टोर कंपनीला एवढे नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि निविदा मूल्य असलेले काम देऊ शकते.

L2 – SWAAI INDIA PRIVATE LIMITED
Vendor Code – 43606
संबधीत कंपनीला कुठलाही प्रकारचा यांत्रिक संबधीत अनुभव नाही आहे. या कंपनीची वार्षिक उलाढाल सुद्धा निवेदेमध्ये नमूद केल्यानुसार ४८ करोड पेक्षा कमी आहे

L3 – AURA FACILITIES MANAGMENT PVT LTD
Vendor Code – 31069
संबधीत कंपनी ही एक Facility Management असून ह्या कंपनीला कुठलाही प्रकारचा यांत्रिक संबधीत अनुभव नाही आहे. या कंपनीची वार्षिक उलाढाल सुद्धा निवेदेमध्ये नमूद केल्यानुसार ४८ करोड पेक्षा कमी आहे.

​संबधीत निविदा भरण्याची अंतिम दिनांक 24th March 2022 होती. मला खरच आश्चर्य वाटते कि ह्या निवेदीची Commercial Packet 18th April 2022 रोजी उघडण्यात आले. अवघ्या विक्रमी १४ कार्यालयीन कामकाजाच्या दिवसामध्ये इतक्या मोठ्या निवेदेच्या कागदपत्रांची तपासणी आणि फडताळणी ही यां.व. वि ह्या विभागाने आणि लेखापाल विभागाने पूर्ण केली. त्यामुळे ही दोन्ही विभाग अभिनंदनास पात्र आहेत ह्यात शंका नाही, असा खोचक टोला साटम यांनी लगावला आहे.

​प्रमुख अभियंता (यां. व वि.) ह्यांनी दिलेल्या उत्तरामध्ये नमूद केले कि सदर कामाकरिता रु. १६० कोटी इतका किंमतेचे अंदाजपत्रक असताना कंपन्यांनी खालील किमंतीची बोली लावली.

Sr. No
Vendor Code
Vendor Name
Quoted Price
Diff with Tender Price of Rs.160Cr.
% Raise
L1
18493
PARICHAY DEPARTMENT STORES PVT LTD
174,54,51,000
14,54,51000
9.090688
L2
43606
SWAAI INDIA PRIVATE LIMITED
186,25,33,436
26,25,33436
16.40834
L3
31069
AURA FACILITIES MANAGMENT PVT LTD
192,03,50,000
32,03,50000
20.02188

वरील बोली लावलेली किंमती बघता एकतर संबंधित यां. व वि. विभागाने योग्य त्यारीत्या अंदाजपत्रक बनवले नाही. मला अजून एक आश्चर्य वाटते कि लेखापाल विभागाने सुद्धा याबाबत काहीही शंका उपस्थित न करता प्रस्ताव मंजूर केला.

आपणांस प्रशासक म्हणून हि सूचना करू इच्छितो कि संबंधित विभाग यां. व. वि आणि लेखापाल येथील अधिकाऱ्यांची योग्य ती चौकशी करून कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी. या संबंधी आपण तशी सकारात्मक व कठोर पाऊलं उचलले नाही तर याचा अर्थ आपण राजकीय दबावाला बळी पडत जनतेच्या पैशाची चाललेल्या धूलाईला आपली मूकसंमती आहे, असे साटम यांनी पत्रात नमूद केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here