@maharashtracity

मुंबई: समस्त आठरापगड बहुजन समाजाचं दैवत आणि हिंदु संस्कृतीचा जीर्णोधार करणाऱ्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींची (Ahilya Bai Holkar) जयंती येत्या ३१ मे ला आहे. दरवर्षी प्रमाणे आपण याही वर्षी अहिल्यामातेच्या जन्मस्थळी चौंडी येथे मोठ्या ताकदीनं जमायचे आहे, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे विधान परिषद सदस्य गोपीचंद पडळकर (BJP leader Gopichand Padalkar) यांनी केले आहे.

पडळकर म्हणाले, या निमित्तानं विस्थापितांना संघर्षाची ताकद देणारा होळकरशाही इतिहास आपल्याला आठवायचा आहे. या इतिहासावर, आपल्या प्रेरणास्थळावर वाकडी नजर टाकणाऱ्यांना आपल्याला जाब विचारायचा आहे.

त्यासाठी मी श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांचे मुळ गाव होळ, महाराजा यशवंतराव होळकर यांचे जन्मगाव वाफगाव किल्ला, मल्हारी मार्तंड श्री खंडोबारायाची जेजूरी, सरसेनापती बी.के कोकरे यांचे उंडवडी गाव अशा विविध ठिकाणी आपल्या इतिहासाचा जागर करत यात्रेला सुरूवात करतो आहे, असे पडळकर म्हणाले.

दि.२९ मे ते ३१ मे अशी ही यात्रा असणार आहे. या यात्रेची सांगता पुण्यश्लोक अहिल्यामातेचे चौंडी येथे दर्शन घेऊन होणार आहे.

यात्रेत तमाम बहुजन समाजाला आपल्या पराक्रमी इतिहासाचा जागर करायचा आहे. अहिल्यादेवी पर्वाचा जागर करायचा आहे, असे आवाहन करतानाच आपल्या हक्काच्या, अधिकाऱ्याच्या लढ्याला अजून मजबूत करायचे आहे, असे पडळकर म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here