भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार

@maharashtracity

मुंबई: विरोधकांना नामोहरम करण्याचा कट कसा रचला जातोय हे उघड करणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची असून त्यांच्या सुरक्षेत वाढ करा, अशी मागणी भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार (BJP MLA Ashish Shelar) यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

याबाबत माध्यमांशी बोलताना आमदार अँड आशिष शेलार म्हणाले की, ‘हा महाभयंकर कट (conspiracy) असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी सादर केलेल्या पुराव्यात बेकायदेशीर शस्त्रास्त्रांचा वापर, पोलीस यंत्रणाचा गैरवापर या सर्व बाबींचे धागे-दोरे एकमेकांशी गुंतलेले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) याच्या मालमत्तेचा कट देखील उलगडला आहे. एकूण पाहता हा महाभयंकर कट दिसत असल्याने देवेंद्र फडणवीस यांची सुरक्षा तात्काळ वाढवावी अशी मागणी आमदार अँड आशिष शेलार यांच्याकडून करण्यात आली आहे.

सरकारी वकिलांची देखील सुरक्षा वाढवावी

देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेले पुरावे ज्या कटाबद्दल होते, त्या कटाचा मास्टर माईंड विशेष सरकारी वकील अॅडव्होकेट प्रविण चव्हाण (Adv Pravin Chavan) आहेत. त्यामुळे विशेष सरकारी वकील चव्हाण यांच्याशी कोणाच्या गाठीभेटी होत आहेत. कोण व्यक्ती त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या कार्यालयात अथवा घरी जात आहेत. यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. एवढ्या मोठ्या गटाचे मास्टरमाइंड चव्हाण असल्याने त्यांचीही सुरक्षा महत्त्वाची असून राज्य सरकारने विशेष सरकारी वकील यांनादेखील अधिक सुरक्षा पुरवावी अशीही मागणी अशी अँड शेलार यांनी यावेळी केली

अजून पुढचे बरेच अंक बाकी

‘लावं रे तो व्हिडीओ’ काय असतो ते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल दाखवून दिले! सरकारच्या भयंकर कटाचे वगनाट्य उघड करुन ठाकरे सरकारचे त्यांनी “वस्त्रहरण” केले. या नाटकातील “तात्या सरपंच” कोण? मंजुळाबाई कोण? गोप्या कोण? मास्तर कोण? अजून पुढचे बरेच अंक बाकी आहेत, असे खोचक ट्विट करुन आमदार अँड आशिष शेलार यांनी सरकारवळ टीका केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here