@maharashtracity

भाजप आमदार नितेश राणे यांचा संतप्त सवाल

मुंबई: मुंबई महापालिका (BMC school) शाळेत भगवत गीता पठणाला समाजवादी पार्टीने (Samajwadi Party) विरोध केल्याने संतप्त झालेले भाजप आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांनी तर मग शाळेत औरंगबजेब याच्या फतव्याचे पठण व्हावे का असा सवाल उपस्थित केला आहे.

यासंदर्भात नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना विनंती केली आहे की हिंदू धर्माची (Hindu Religion) आस्था असलेल्या गीता पठाणाला (Gita pathan) होणाऱ्या विरोधाला बळी पडू नये.

महानगरपालिकेच्या शाळेत भगवद् गीता पठणाच्या ठरावाची सुचना महापौरांना भारतीय जनता पक्षाच्या योगिताताई कोळी (BJP Corporator Yogita Koli) यांनी केली. परंतू, त्यावर लगेच समाजवादी पार्टीकडून आक्षेप व विरोध घेतला जातोय, खरंतर हे दुर्दैवी व दुख:द आहे, असे नितेश राणे म्हणाले.

ते म्हणतात, ज्याप्रमाणे भारतीय संस्कृतीतील योग (Yog) ज्ञान जगाने स्वीकारले, अंगीकारले, त्यात कोणत्याही धर्माचा अडसर नाही. त्याचप्रमाणे जगभरातील विद्यापीठे, तत्ववेत्ते आणि विचारवंत तत्वज्ञानाच्या अभ्यासात भगवद् गीता या ग्रंथाला अन्यन साधारण महत्व देतात.

अमेरिकेतील सेटॉन हॉल युनिव्हर्सिटीत (Seton Hall University, USA) तर भगवद् गीता आणि मॅनेजमेंट अशा पद्धतीचे कोर्सेसही शिकवले जात आहेत याकडे लक्ष वेधून नितेश राणे म्हणतात, “संपूर्ण जग, तत्वज्ञान ते कॉरपोरेट अशा सर्वच क्षेत्रात भगवद् गीतेच महत्व मान्य करत आहे. कारण हा ग्रंथ मानवी कल्याणाचा मार्ग सांगतो.”

भगवद् गीता पठण विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासात महत्वाची भूमिका पार पाडेल, यात कुठलीही शंका असण्याचं कारण नाही. परंतू आपल्याच देशात जर गीता पठणला विरोध होत असेल तर मग विद्यार्थ्यांना औरंजेबाचे (Aurangzeb) ‘फ़तवा-ए-आलमगीरी’ चे पठण करायला लावायचे का? जेणेकरून मुख्तार अन्सारी सारखे माणसं यांना घरोघरी जन्माला घालता येतील? असा संतप्त सवाल राणे यांनी उपस्थित केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून राणे म्हणाले, “मला खात्री आहे की स्व. हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे सुपुत्र म्हणून अशा भगवद् गीता पठणाला होणाऱ्या विरोधाच्या दबावापुढे आपण झुकणार नाहीत आणि योगिताताई कोळींची सुचना मान्य करण्यास आपण पक्षप्रमुख म्हणून लगेचच निर्देशीत कराल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here