@maharashtracity

मुंबई: उत्तर भारतीय संघाचे (मुंबई) अध्यक्ष, भारतीय जनता पार्टीचे विधानपरिषद सदस्य आर. एन. सिंग (BJP MLC R N Singh) यांचे शनिवारी गोरखपूर (उत्तरप्रदेश) येथे हृदयविकाराने निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.

मुंबईतील सर्वात जुन्या समजल्या जाणाऱ्या उत्तर भारतीय संघाचे (Uttar Bharatiya Sangh) ते सातव्यांदा अध्यक्ष झाले होते. ८ जुलै २०१६ मध्ये ते भाजपच्या (BJP) तिकिटावर विधानपरिषदेवर निवडून गेले होते. ७ जुलै २०२२ रोजी त्यांच्या सदस्यत्वाचा कार्यकाळ रोजी संपणार होता.

मुंबईत राहणाऱ्या उत्तरप्रदेशमधील (Uttar Pradesh) बांधवांसाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवले होते. मुंबई विद्यापीठामध्ये (Mumbai University) उत्तरप्रदेश भवनसाठी जमीन मिळावी, यासाठी त्यांनी विधान परिषदेमध्ये आवाज उठवला होता. त्यांच्या निधनामुळे हिंदी भाषिकांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here