@maharashtracity

मुंबई: मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीवर (Standing Committee) नामनिर्देशित सदस्य म्हणून भाजपतर्फे (BJP) भालचंद्र शिरसाट (Bhalchandra Shirsat) यांच्या करण्यात आलेल्या नेमणुकीला महापालिका प्रशासन व महापौर यांनी आक्षेप घेऊन रद्द ठरवले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने (SC) शिरसाट यांची नेमणूक योग्य असल्याचे सांगत पालिकेचा निर्णय चुकीचा ठरवला आहे.

त्यामुळे भालचंद्र शिरसाट यांचे स्थायी समितीवरील सदस्यत्व मुदत संपेपर्यंत कायम राहणार आहे. यासंदर्भातील माहिती भालचंद्र शिरसाट यांनी दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने आज मुंबईचे महापौर व महापालिकेची रिव्ह्यू पिटिशन डिसमिस केली. तसेच, भालचंद्र शिरसाट यांचे स्थायी समितीवरील सदस्यत्व कायम ठेवण्यावर शिक्कामोर्तब केले आहे.

नामनिर्देशित सदस्य भालचंद्र शिरसाट यांच्या स्थायी समितीवरील नामनिर्देशनाला रद्द ठरविणारा महापालिकेचा ठराव उच्च न्यायालयात खारिज (रद्द) करण्यात आला होता. त्याला मुंबई महापालिका आणि महापौर यांनी सर्वोच्च न्यायालयात रिव्ह्यू पिटिशन द्वारे आव्हान दिले होते.

आजचा निर्णय हा लोकशाहीचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया भाजपा गटनेते प्रभाकर शिंदे (BJP group leader Prabhakar Shinde) यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here