@maharashtracity

विरोधकांच्या आरोपांना तोंड देण्यास सरकार सक्षम

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची प्रकृती चांगली असून ते अधिवेशनात उपस्थित राहणार आहेत. त्यांनी १० ते १२ कॅबिनेट घेतल्या असून ‘वर्षा’वर देखील येत आहेत. सर्व कामकामज व्यवस्थित सुरु आहे. कोरोना (corona) काळात मुख्यमंत्र्यांनी केलेल्या कामाचे कौतुक जगाने केले. विरोधक याचा उल्लेख ही करत नाहीत. विरोधक त्यांना विरोधी चष्म्यातूनच पाहत नाव ठेवण्याचे काम करत आहेत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्राबद्दल उपस्थित केल्या जात असलेल्या शकांना उत्तरे दिली.

पवार अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापान कार्यक्रमानंतर माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना बोलत होते. ते म्हणाले, कोरोना काळात मुख्यमंत्री यांच्या कामाचे कौतुक देशपातळीवर झाले. मात्र विरोधी पक्ष घोटाळा झाला असे म्हणत आहेत. लोकांनी मुख्यमंत्र्यांना लोकप्रिय ठरवलं. पण विरोधक त्यांच्या चष्म्यातून मुख्यमंत्र्यांना पाहत आहेत.

मुख्यमंत्री यांची प्रकृती स्वास्थ चांगले असून ते मंगळवारी देखील विधिमंडळात आले असल्याची माहिती पवार यांनी दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्वांना सुचना केल्या. सर्वांनी व्यवस्थित काम करावे असे सुचित केल्याचे पवार म्हणाले.

विरोधी पक्षाने मुख्यमंत्री यांनी बोलावलेल्या चहापान कार्यक्रमावर घातलेल्या बहिष्काराबद्दल अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली.

पवार म्हणाले, एवढ्या वर्षात सातत्याने चहापानवर बहिष्कार टाकला जातो, हे अस घडायला नको. कधी तरी ठीक आहे. पण नेहमीच असे होत असेल तर कसे चालेल? मुख्यमंत्री यांनी चहापानसाठी निमंत्रण देतात त्यामागे चर्चा व्हावी असा उद्देश असतो.

आरोग्य विभागाच्या परिक्षा, एसटी संप आणि कुलगुरु आदि विषयांवरुन अधिवेशनात होणाऱ्या चर्चांना रोखठोक उत्तर सरकारकडे असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

आमदार निलंबनावर बोलताना पवार म्हणाले की, कोणताही विषय डोळयांसमोर ठेवून हे निलंबन केलं नसून तेव्हाची परिस्थिती बघून तो निर्णय घेण्यात आला. विधीमंडळाच्या कामकाजात योग्य न ठरणारी भाषा वापरली गेली. जी नाव काढली तेव्हा ती १२ निघाली. तेव्हा राज्यपाल यांनी १२ उमेदवारांना मंजुरी दिली नाही म्हणून ही कारवाई केल्याची चर्चा झाली.

पवार पुढे म्हणाले की, हिवाळी अधिवेशन नागपूरात व्हावे यासाठी महाविकास आघाडी सरकार आग्रही होते. मुख्यमंत्री यांची प्रकृती नाजूक असल्याने विरोधकांनीही मुंबईत अधिवेशन घेण्यास मंजुरी दिली.

सध्या कोरोनामुळे अधिवेशन कमी दिवसाचं घेतले जात आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर अनेक राज्यात कमी दिवसाचे अधिवेशन झाले असल्याची उदाहरणे पवार यांनी यावेळी दिली. पश्चिम बंगालमध्ये तर १ दिवसच अधिवेशन झाले याकडे त्यांनी लक्ष वेधले.

तरीही अधिवेशनाबाबत पुन्हा एकदा कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार असल्याचे त्यांनी सांगितले. ओबीसी आरक्षण, एसटी संप, परीक्षा घोटाळा, वीजबिल, विदेशी मद्य दर कपात, हे विषय चर्चेत येणार असल्याचे सांगण्यात आले.

तसेच महाराष्ट्राएवढा मद्य दर एवढा कर इतर कोणत्याही राज्यात नाही. आताही आपला कर जास्तच आहे. कर अधिक असेल तर लोक कर चुकवत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

दरम्यान ५ विधेयक प्रलंबित असून २१ विधेयकांना मंत्रिमंडळाने मंजूर दिलेली आहे. अशी एकूण २६ विधेयक आहेत. शक्ती कायदा विधेयक गृहमंत्री मांडणार आहेत. तर कृषी कायदा शेतकऱ्यांच्या १ वर्षाच्या आंदोलनानंतर केंद्राने मागे घेतल्याने महाराष्ट्र देखील यासंदर्भातील कायदा मागे घेणारे विधेयक मांडणार आहे.

ओबीसी आरक्षणावर बोलताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, महाराष्ट्र बाबत जे घडलं ते मध्य प्रदेशच्या बाबत घडत आहे. तसच कर्नाटक राज्याबाबत ही होताना दिसत असून अधिवेशनात हा मुद्दा आला तर यावर सरकार सविस्तर उत्तर देईल.

तसेच कुलगुरू विषयात राज्यपाल यांचे अधिकार कमी केले नसल्याचे यावेळी सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here