@maharashtracity
मुंबई: महापालिका आयुक्तांनी गरिबांऐवजी श्रीमंतांसाठी बनवलेला फुगीर आकड्यांचा अर्थसंकल्प सादर केला आहे, अशी तिखट प्रतिक्रिया समाजवादी पक्षाचे गटनेते व आमदार रईस शेख यांनी व्यक्त केली आहे.
या अर्थसंकल्पाने मुंबईचे ‘गरीबांची मुंबई आणि श्रीमंतांची मुंबई’ अशा दोन तुकडयांमध्ये विभाजन केले आहे. मुंबईतील चाळींमध्ये, झोपडपट्टी राहणारा सर्वसामान्य मुंबईकरासाठी अर्थसंकल्पात काहीही केल्याचे दिसून येत नाही. खड्डेमुक्त रस्ते, स्वच्छ पिण्याचे पाणी, कचरा विरहित स्वच्छ मुंबई आदी उद्दिष्ट यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये सफल झालेली नाहीत.