भोंदूबाबापासून पीडित झालेल्यांनी पुढे यावे
@maharashtracity
येवला (नाशिक): येवल्यातील बलात्कारी बाबांकडून कोणी महिला पीडित झाली असेल तर तिने आपल्याशी संपर्क साधावा, तिची माहिती गोपनीय ठेवली जाईल. या बाबाला कठोर शिक्षा देण्यासाठी महिलांनी पुढे यावे, असे आवाहन भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ (BJP leader Chitra Wagh) यांनी केले आहे.
येवला (Yeola) तालुक्यातील नागडे येथील भोंदूबाबा व त्याच्या भावाकडून एका आईसह तिच्या 3 मुलींवर बलात्कार (Rape) व धर्म परिवर्तनसाठी बळजबरी केल्याची घटना काही दिवसांपूर्वी येवल्यात घडली होती. याच बलात्कार प्रकरणासंदर्भात चित्रा वाघ यांनी येवला येथे पीडितेच्या घरी जाऊन भेट घेतली.
तसेच शहर पोलीस ठाण्यात या घटनेसंदर्भात तपास कुठपर्यत आला याबाबत जाऊन माहिती घेतली. अशा भोंदूबाबाना आळा बसला पाहिजे, सर्वत्र असे भोंदूबाबा असून ज्या कोणी अशा भोंदूबाबापासून पीडित असेल त्यांनी पुढे यावे, त्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन चित्रा वाघ यांनी केले आहे.
राज्यातील कायदा व सुव्यवस्था (Law and Order) बिघडली असून अशाप्रकारे भोंदू बाबांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात वाढला आहे. भोंदूबाबांना कायद्याचा धाक राहिला नसून महाराष्ट्र (Maharashtra) कुठे चालला आहे आहे? अशी संतप्त प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी दिली.