@maharashtracity

मुंबई: राज्याच्या सर्वसमावेशक प्रगतीसाठी विविध क्षेत्रातील विकासाच्या दऱ्या सांधल्या जाणे आवश्यक असून सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांनी परस्पर सहकार्य आणि समन्वयातून (coordination) सांघिक प्रयत्न करावेत. असे करतांना नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घ्यावेत, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddav Thackeray) यांनी दिल्या.

सामाजिक विकासाची दिशा ही तेंव्हाच उपयुक्त सिद्ध होते जेंव्हा सर्वसामान्यांच्या मुलभूत गरजा आणि त्यांच्या इच्छा आकांक्षांची पुर्तता होते. त्यामुळे केवळ प्रशासकीय अधिकारी म्हणून न काम करता त्यांच्यातीलच एक होऊन काम करणे, त्यासाठी अचूक नियोजन, उपलब्ध संसाधनांचा उत्तम वापर करणे, स्थानिकांना या विकास संकल्पनेत सहभागी करून घेऊन, त्यांच्या गरजा समजून घेऊन काम करणे गरजेचे असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

आजच्या बैठकीत आरोग्य, शिक्षण, कृषी, कौशल्य विकास व वित्तीय समावेशन, पर्यटन, ग्रामीण विकास अशा विविध विषयांवरील सादरीकरण करण्यात येऊन आकांक्षित जिल्ह्यांमध्ये (aspirational district) राबविण्यात येत असलेल्या योजनांची स्थिती आणि अंमलबजावणीची दिशा याची माहिती देण्यात आली.

नीती आयोगाच्यावतीने (NITI Aayog) मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत (Amitabh Kant) यांनी आकांक्षित जिल्ह्यांच्या प्रगतीची माहिती देणारे सादरीकरण केले. बैठकीत केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाचे सचिव नागेंद्र सिन्हा यांच्यासह आरोग्य (Health), शिक्षण (Education), कृषी (Agriculture), कौशल्य विकास मंत्रालयाचे (Skill Development) सचिव उपस्थित होते. त्यांनीही विविध योजनांच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या उपाययोजना व राज्यांना भविष्यात द्यावयाच्या उद्दिष्टांबाबत माहिती दिली.

या बैठकीस निमंत्रित राज्यांचे मुख्यमंत्री, मुख्यसचिव, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्यातील गडचिरोली ,Gadchiroli) नंदुरबार (Nandurbar), उस्मानाबाद (Osmanabad), वाशिम (Washim), सिंधुदूर्ग (Sindhudurg), हिंगोली (Hingoli) आणि यवतमाळ (Yeotmal) जिल्ह्याचे जिल्हाधिकारीही बैठकीस ऑनलाईन उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here