By Sadanand Khopkar

Twitter: @maharashtracity

मुंबई: सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा जिथे सुरू केली त्या भिडेवाडा वास्तुला संरक्षित स्मारकाचा दर्जा देण्यास पुरातत्व विभागाने नकार दिला असला तरी सरकार भिडेवाड्याला (Bhide Wada) संरक्षित स्मारकाचा दर्जा देण्यास सिद्ध आहे. यासाठी शासन न्यायालयामध्ये आवश्यक कागदपत्रे सादर करून  मागणी करील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या उत्तरात सांगितले.

सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांनी पुणे येथील भिडेवाडा येथे मुलींची पहिला शाळा चालू केली. या ठिकाणी स्मारक उभारण्याविषयी सदस्य चेतन तुपे यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

उत्तर देतांना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, भिडेवाडा येथे स्मारक करण्याविषयी तेथील जागेचे मालक, विकासक आणि भाडेकरू यांच्या समवेतही बैठक घेण्यात येणार आहे. याविषयी पुणे महानगरपालिकेला (Pune Municipal corporation) स्मारकाचा आराखडा सिद्ध करून शासनाला सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आला आहे. न्यायालयीन दाव्यांमुळे या जागेच्या भूसंपादनात समस्या असल्याचे त्यांनी उत्तरात सांगितले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here