@maharashtracity
मुख्यमंत्री गुरुवारी घरी येण्याची शक्यता
मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना आज सोमवारपर्यंत घरी सोडण्यात येईल अशी शक्यता होती. मात्र, मुख्यमंत्री अद्याप हॉस्पिटलमध्ये आहेत. बुधवारी त्यांचा डिस्चार्ज देण्यात येणार अशी शक्यता होती. मात्र ती आता गुरुवारी म्हणजे दिनांक 18 रोजी देण्यात येईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
ठाकरे यांच्यावर १२ नोव्हेंबर शुक्रवारी रोजी सकाळी ७ः३० वाजता वरिष्ठ आँर्थो सर्जन डॉक्टरांच्या टीमने सुमारे तासभर सर्व्हायकल स्पाईनसंबंधित (Survical spine) शस्त्रक्रिया केली. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती एच.एन. रिलायन्स रुग्णालयाच्या (HN Reliance Hospital) डॉक्टरांकडून त्याच दिवशी देण्यात आली.
दरम्यान शनिवार आणि रविवार असे दोन दिवस मुख्यमंत्र्यांचे हॉस्पिटल वेळापत्रक असून सोमवारी ते घरी परततील असा अंदाज त्यावेळी वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला होता. मात्र आता गुरुवारी डिस्चार्ज देण्यात येईल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.