uddhav

@maharashtracity

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई: गेल्या दहा दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) उपचाराधीन आहेत. त्यांच्या प्रकृतीबद्दल संपूर्ण राज्याला चिंता असताना सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी ठाकरे यांची प्रकृती स्थिर असून गुरुवारी (आज) होणाऱ्या कॅबिनेट बैठकीला व्हीडिओ कॉन्फेरंसिंग (Video Conferencing) द्वारे उपस्थित राहणार असल्याची माहिती दिली.

तिसरी लाट (third wave of covid), बूस्टर डोस आणि लहानग्यांचे लसीकरण या विषयावर टोपे पत्रकारांना माहिती देत होते.

राज्यातील संसर्ग कमी झाला असला तरीही कोरोनाच्या (corona) नियमांकडे दुर्लक्ष करुन चालणार नसल्याचे टोपे यावेळी म्हणाले. सध्या परिस्थिती सुधारत असून अशीच सुधारत राहिल्यास भविष्यात निर्बंध आणखी शिथिल करण्याच्या संदर्भात मुख्यमंत्री स्तरावर यावर निर्णय निर्णय घेण्यात येईल, असंही टोपे यांनी सांगितले.

संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत बोलताना टोपे म्हणाले की, तिसरी लाट सौम्य स्वरुपाची असू शकते. सध्यातरी फार काळजीचा विषय नसला तरी काळजी घेणं आणि लसीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. लसीकरण डेल्टा व्हेरियंटवर (Delta Variant) परिणामकारक ठरतेय हे निरीक्षणातून सिद्ध होतेय.

परंतु याचा अर्थ आपल्याला बेजाजबदारपणे वागता येणार नाही. राज्यात अद्याप डेल्टा व्हेरियंट सोडून कोणता नवीन व्हेरियंट आल्याचे ऐकिवात नाही. मात्र जर्मनी (Germany), ऑस्ट्रेलियामध्ये (Australia) डेल्टाचा प्रभाव दिसून येत असल्याने आपल्यालाही बेजबाबदारपणे वागता येणार नाही असे ही ते म्हणाले.

लसीकरणाच्या बाबतीत पहिला डोस पूर्ण झाल्याचे प्रमाण ८० टक्के इतके आहे तर दुसरा डोस पूर्ण झाल्याचं प्रमाण ४० टक्के इतके आहे. आता लसी देऊन एक वर्ष झाले आहे तर त्यांना बूस्टर डॉस देण्यात यावा अशी मागणी केंद्राकडे करण्यात आले असल्याचे आरोग्यमंत्री टोपे यांनी यावेळी सांगितले.

Also Read: रेल्वे अपघातात पाय गमावलेल्या त्या तरुणीला ठाणे मनपाने दिले हक्काच घर

कोरोना रुग्णांची (corona patients) संख्या आटोक्यात आल्यानंतर राज्यातील अनेक निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. तसंच, शाळांबाबतही लवकरच निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. अशी टोपे यांनी माहिती दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here