@maharashtracity

मुंबई: राज्यात डेंग्यू, मलेरिया, चिकनगुणिया सारख्या पावसाळी आजाराचे रुग्ण वाढत असल्याने डोकेदुखील वाढली आहे. हे पावसाळी आजार आता नियंत्रणात ठेवण्याचे आदेश सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दिले आहेत.

गृहभेटी करा, समुपदेशन करा, जागरुकता वाढवा यावर भर देण्याचा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, राज्यात पावसाळी आजारांतील चिकनगुनियाचे रुग्ण वाढले असून गेल्या पाच वर्षातील यावर्षीची नोंद अधिक आहे. महाराष्ट्रात या वर्षी जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत चिकुनगुनिया तापाचे २,००६ रुग्ण आढळले.

ही नोद २०१७ नंतरची सर्वाधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. २०१७ या वर्षात १,४३८ रुग्ण नोंदविण्यात आले होते. तर २०१८ आणि २०१९ या दोन वर्षात राज्यात अनुक्रमे १,००९ आणि १,६४६ प्रकरणे आढळली.

कोरोनाच्या २०२० या वर्षात चिकनगुनिया रुग्णसंख्या ७८२ एवढी होती. म्हणूनच राज्याला त्रासदायक ठरत असलेल्या पावसाळी आजारांना नियंत्रणात ठेवण्याचे आदेश राजेश टोपे यांनी जिल्हा निहाय आरोग्य अधिकाऱ्यांना दिले आहेत.

Also Read: आरोग्य विभागाच्या गट ड संवर्ग रिक्त पदाची रविवारी परिक्षा

अधूनमधून पडणारा पाऊस यामुळे चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे राज्याच्या आरोग्य विभागातील वरिष्ठ आरोग्य अधिकारी सांगतात. हा संसर्ग एडिस इजिप्ती डासाद्वारे पसरतो जो डेंग्यूच्या प्रसारासाठी देखील जबाबदार असतो.

दुसरीकडे यंदा डेंग्यूच्या रुग्णांमध्येही वाढ झाली आहे. आतापर्यंत जवळपास १०,००० रुग्ण आणि २२ डेंग्यूमुळे मृत्यूची नोंद झाली आहे, गेल्या वर्षी ३,३५६ रुग्ण आणि दहा मृत्यू नोंदवण्यात आले होते.

डेंग्यूची सर्वाधिक संख्या पुणे जिल्ह्यात (३५४) आहे. तर, महामंडळाने २१५ रुग्ण नोंदले आहेत. नाशिक ग्रामीण आणि महानगरपालिका मिळून ९०५ रुग्णांची नोंद झाली आहे.

इतर जिल्ह्यांपैकी साताऱ्यात ७३, कोल्हापूर १४८, बीड ३८ आणि अमरावतीत २९ रुग्ण नोंदविण्यात आले. राज्य साथरोग सर्वेक्षण अधिकारी, डॉ प्रदिप आवटे यांनी सांगितले की, आरोग्य अधिकारी त्यांच्या क्षेत्रात फिरुन घरोघरी भेट देत असून डासांची उत्पत्ती स्थळे देखील नष्ट केली जात आहेत.

पाच वर्षातील चिकनगुनिया रुग्णसंख्या

वर्ष संशयित रुग्ण
२०१७ ८,११० १,४३८
२०१८ ९,८८४ १,००९
२०१९ ५,१५८ १,६४६
२०२० ४,२५८ ७८२
२०२१ ३,३६५ २,००६

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here