@maharashtracity

मुंबई: सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री (sale of wine in the supermarket) करण्यास परवानगी देण्याच्या राज्य मंत्रिमंडळाने आज घेतलेल्या निर्णयाला विपक्ष भारतीय जनता पक्षाने (BJP) विरोध केला आहे. महाराष्ट्राचे मद्यराष्ट होऊ देणार नाही, असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिला आहे.

ज्या छोट्या वाईन उत्पादक शेकऱ्यांकडे विपणन (marketing) व्यवस्था नाही, अशा शेतकऱ्यांना मदत व्हावी या उद्देशानेच सुपर मार्केट (Super Market) किंवा जेथे स्वयं सेवेने खरेदी करण्याची सुविधा आहे अशा वॉक इन स्टोअर (walk in-store) मध्ये वाईन विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्टीकरण महाविकास आघाडी सरकारने (MVA government) दिले आहे.

मात्र, या निर्णयावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, आघाडी सरकारच्या काळात राज्यात दारू स्वस्त झाली आहे तर पेट्रोल (Petrol) आणि डिझेल (Diesel) महाग झाले आहे.

“दारू बंदी संपवून हे सरकार दारू विक्रीला प्रोत्साहन देत आहे. महाराष्ट्रात नवीन दारूविक्री परवाने देण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. आता थेट सुपर मार्केट, किराणा दुकानातून घरोघरी दारू मिळेल अशी व्यवस्था उभी केली जात आहे,” अशी टीका फडणवीस यांनी केली.

महाराष्ट्राला ‘मद्यराष्ट्र’ (state of liquor) करण्याचा हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

शेतकरी-कष्टकरी, गरिब, बारा-बलुतेदार अशा एकाही घटकाला राज्य सरकारने गेल्या दोन वर्षांच्या कोरोना कालखंडात (corona pandemic) मदत केली नाही. सरकारचे प्राधान्य केवळ आणि केवळ दारूला आहे, अशी टीका करून सत्तेच्या ‘नशे’त धुंद सरकारने गरिबांना थोडी तरी मदत करावी, अशी अपेक्षा फडणवीस यांनी व्यक्त केली.

दरम्यान, ज्या जिल्ह्यात दारू बंदी आहे, तिथे सुपर मार्केट मध्ये वाईन उपलब्ध करून देण्याचा निर्णय लागू होणार नाही, असे राज्य शासनाने नमूद केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here