By Ananat Nalawade

Twitter : @nalawadeanant

मुंबई: विधानसभेत विशेष बैठकीत लक्षवेधी सूचनेला उत्तर देण्यासाठी आज सहा मंत्री अनुपस्थित होते. सलग दुसऱ्या दिवशी हा प्रकार झाल्याने असल्याने विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा संताप अनावर झाला. हा गलिच्छपणा असून यांना जनाची नाही तर मनाचीही लाज वाटत नाही का, असा जळजळीत सवाल पवार यांनी केला. जनतेचे प्रश्‍न सोडवण्यासाठी जनता लोकप्रतिनिधींना निवडून देते. प्रश्‍नांवर चर्चा होत नसेल, तर जनतेसमवेत अन्याय ठरेल. मंत्री अनुपस्थित राहणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी या शब्दात अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही शासनाला समज दिली. यावर मंत्री उपस्थित नसणे ही गंभीर गोष्ट आहे, असे स्पष्ट करीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलगीरी व्यक्त केली.

केवळ महिला आणि बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची सकाळी लक्षवेधी झाली. इतर लक्षवेधी सूचनांना उत्तर देण्यासाठी विभागांचे सहा मंत्री अनुपस्थित होते. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी याबद्दल तीव्र भावना व्यक्त केल्या.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, काल रात्री १ वाजेपर्यंत सभागृह चालले. लक्षवेधी असेल, तर सकाळी उत्तर देण्यासाठी मंत्र्यांना माहिती घेण्यास वेळच मिळत नाही; मात्र, आता सुधारणा करण्यात येईल. आदल्या दिवशी मंत्र्यांना अभ्यास करण्यासाठी लक्षवेधी सूचनेची असुधारित प्रत पाठवण्याची व्यवस्था केली जाईल.

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले लक्षवेधी साठी मंत्र्यांनी उपस्थित रहायलाच हवे. अधिवेशनासाठी एकूण २ हजार ३७६ लक्षवेधी ऑनलाईन प्राप्त झाल्या आहेत. गेल्या ७-८ दिवसांत ५७ लक्षवेधी चर्चेसाठी घेण्यात आल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here