गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांची माहिती

मुंबई: सुमारे आठ हजार सामान्य गुंतवणूकदारांना (investors) पाचशे कोटीहून अधिक रकमेला फसवणाऱ्या कडकनाथ (Kadaknath) कोंबडी घोटाळ्याची (scam) चौकशी आर्थिक गुन्हे अन्वेषण (EOW) मार्फत केली जाणार आहे, अशी माहिती गृह राज्यमंत्री शंभूराजे देसाई (Shambhuraj Desai) यांनी आज दिली. या घोटाळ्यात माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांचे पुत्र सागर (Sagar) खोत यांचा सहभाग असल्याचा आरोप गुंतवणुकदार संघर्ष समितीने केला आहे.

मंत्रालयात पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करतांना राज्यमंत्री देसाई यांनी सांगितले की, EOW च्या एका अधिकाऱ्याकडे या चौकशीचे काम सोपविण्यात आले आहे. “या घोटाळ्याची व्याप्ती खूप मोठी आहे. महाराष्ट्राबाहेरही (Maharashtra) या घोटाळ्याची व्याप्ती आहे. EOW चा आपला अधिकारी आपल्या राज्यातील घोटाळ्याची चौकशी करेल,” असे देसाई म्हणाले.

देसाई यांनी सांगितले की, काही गुंतवणूकदार त्यांना भेटले. त्यांच्या अंगावरील वस्त्र बघून त्यांच्या परिस्थितीची जाणीव होते. मुख्यमंत्री (CM) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी या घोटाळ्याच्या चौकशीत लक्ष घातले असून ती पूर्ण करण्याचे निर्देश दिल्याचे शंभूराजे देसाई म्हणाले. या घोटाळ्यातील सशयितांचे नाव न घेता राज्यमंत्री म्हणाले की यात खूप ‘मोठे लोक’ गुंतलेले आहेत.

कडकनाथ कोंबडीचे पिल्ले पुरवणे आणि अंडी खरेदी करणे, एका वर्षानतर त्याच कोंबड्या पुन्हा चढ्या भावाने खरेदी करणे असे मोठ्या आर्थिक लाभाचे आमिष दाखवून संदीप मोहिते (Sandeep Mohite) आणि सुबोध मोहिते (Subodh Mohite) या दुक्कलीने रयत ऍग्रो प्रा लिमिटेड (Rayat Agro Pvt Ltd)  या कंपनीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची फसवणूक केली आहे. 

या घोटाळ्यात माजी मंत्री सदाभाऊ खोत यांचे सुपुत्र सागर हे सहाव्या क्रमांकाचे आरोपी होते. मात्र, कालांतराने सागर खोत यांना  साक्षिदार बनविण्यात आले. सागर याचा या घोटाळयाशी संबंध नाही, असा दावा सदाभाऊ खोत यांनी याधीच TheNews21 शी बोलताना केला आहे.

गुंतवणूकदारांचा लढा देणारे भागवत जाधव, कॉ दिग्विजय पाटीलआणि प्रहार संघटनेचे स्वप्नील पाटील यांनी कडकनाथ घोटाळ्याची चौकशी गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्याची मागणी केली होती. मात्र, गुन्ह्याची व्याप्ती बघून सरकारने ही चौकशी आर्थिक गुन्हे विभागाकडे सोपवली आहे. 

भाजपचे (BJP) माजी खासदार आणि लढाऊ नेते डॉ किरीट सोमय्या (Kirit Somaiya)  यांनीही त्यांच्याकडे गुंतवणूकदारांनी संपर्क साधल्यास EOW कडे तक्रार करू, अशी ग्वाही दिली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here