चांगला नेता होण्यासाठी होण्यासाठी प्रथम चांगले अनुयायी व्हा : राज्यपाल

@maharashtracity

मुंबई: काही लोकांमध्ये नेतृत्वगुण उपजत असतात. इतरांनी नेतृत्वगुण प्रयत्नपूर्वक बाणवले पाहिजे, असे सांगताना युवकांनी नेते अवश्य बनावे. परंतु, नेतेगिरी करु नये, अशी सूचना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी आज युवकांना केली.

एक वाईट सैनिक चांगला सेनानी कधीही होऊ शकत नाही. यास्तव चांगला नेता होण्यासाठी प्रथम चांगले अनुयायी झाले पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले. विविध जिल्ह्यांमधून आलेल्या युवकांच्या केंद्रीय व राज्यस्तरीय अभिरुप मंत्रिपरिषद सदस्यांनी राज्यपाल कोश्यारी यांची राजभवन (Raj Bhavan) येथे भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

अंदाजे ६० – ७० वर्षांपूर्वी आपण महाविद्यालयात असताना अभिरूप संसदेत भाग घेत असू याचे स्मरण राज्यपालांनी केले. महाविद्यालयात असताना आपण महासचिव म्हणून निवडून आलो होतो याची आठवण सांगताना युवकांना समाज कार्याची आवड व अंतःप्रेरणा असल्यास हाती घेतलेले कार्य अधिक चांगले होते असे राज्यपालांनी सांगितले.

महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यातदेखील शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात, त्यावेळी आपल्याला वाईट वाटते असे नमूद करून युवा सदस्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना जगण्याची उमेद दिली पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here