केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हस्ते नियुक्तीपत्र
Twitter: @maharashtracity
जालना: राष्ट्रीय जिल्हा पंचायत असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी जालना जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जयमंगल जाधव यांची नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते देण्यात आले आहे.
जयमंगल जाधव यांनी घनसावंगी तालुक्यातील खडका गावचे उपसरपंच, सक्रिय क्रियाशील उपक्रमशील तालुका युवक अध्यक्ष आणि जिल्हा युवक कार्याध्यक्ष, जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे अभ्यासू सदस्य असा ठसा उमटवला आहे. शेतकरी कुटुंबातील अभ्यासू युवक कार्यकर्ता म्हणून जालना जिल्ह्यामध्ये ओळख असणारे जयमंगल जाधव यांची राष्ट्रीय उपाध्यक्ष, जिल्हा परिषद असोसिएशनपदी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नियुक्ती झाली.
जाधव यांचा विविध सामाजिक चळवळीमध्ये सहभाग असतो. अनेक समाज उपयोगी कामामध्ये पुढाकार असतो. जालना जिल्ह्यात ते स्वतः आर्ट ऑफ लिविंगचे योग प्रशिक्षक म्हणून युवकांसाठी शिबिरे घेतात. या सर्व बाबी मुळे 23 राज्यांमध्ये कार्यरत असणाऱ्या जिल्हा परिषद राष्ट्रीय जिल्हा परिषद असोसिएशनचे उपाध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या प्रसंगी बोलताना जयमंगल जाधव म्हणाले की, ग्रामीण भागाच्या विकासासाठी युवकांचा पुढाकार अत्यंत महत्त्वाचा आहे. नितीन गडकरी यांनी ज्या पद्धतीने मार्गदर्शन केले त्याप्रमाणे युवकांनी कोणावरही अवलंबून न राहता स्वतः पुढाकार घेतला तर लोक पुढे येतात. ग्रामीण भागात सक्षम आणि कायमस्वरूपी काम उभे करता येते, आज ग्रामीण भागाची ती गरज आहे. यासाठी सर्व युवकांनी पुढाकार घ्यायला पाहिजे अशी गडकरी यांची असलेली अपेक्षा रास्त ठरवण्यासाठी भविष्यामध्ये आपण काम करू, असा विश्वास जाधव यांनी या प्रसंगी दिला.
युवकांमधील व्यसनाधीनता कमी झाली पाहिजे, त्यांची क्रयशक्ती वाढली पाहिजे, त्यांच्यामध्ये सकारात्मकता आणि रचनात्मकता वाढली पाहिजे यासाठी भविष्यामध्ये सतत कार्यरत राहणार असा विश्वास जाधव यांनी यावेळी दिला.
जाधव यांचे नियुक्तीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे. याप्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष जिल्हा परिषद असोसिएशन डॉ कैलास गोरे, राष्ट्रीय सरचिटणीस बेरी सांगता (हिमाचल प्रदेश), राष्ट्रीय महिला अध्यक्षा सरिता गाखरे उपस्थित होते.
घनसावंगी तालुक्यात माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष महेन्द्र पवार, शाम उढान, श्रीराज राजाराम राजे जाधव देशमुख, भास्कर वराडे, दिगंबर ढेरे, मनोज शिंदे, मोहन रोडे, बद्रीनाथ धबडकर, सुनील कोरडे, आतीक बागवान, महेश मातमे, ज्ञानेश्वर जाधव, दयानंद लालझरे, नामदेव साबळे आदींनी जयमंगल जाधव यांचे अभिनंदन केले.