मुंबई
करोना (corona) विरोधातील लढ्यावर यशस्वीरीत्या मात केलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) लढवय्ये नेते डॉ जितेंद्र आव्हाड (Dr Jitendra Awhad) यांनी धारावीचा (Dharavi) पुनर्विकास करावा, अशी मागणी केली आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री असलेले आव्हाड यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री (CM) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र लिहिले आहे.
करोना संकटातून बाहेर पडल्यावर आव्हाड पुन्हा एकदा त्याच आवेशात सक्रिय झाले आहेत. करोना संकटात धारावीचा पुनर्विकास करणे ही महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारला प्राप्त झालेली सुवर्णसंधी आहे, असे आव्हाड यांनी सुचवले आहे.
अत्यंत दाटीवाटीच्या २ किलोमीटर क्षेत्रफळात (साधारण ५२० एकर) विस्तार असलेल्या धारावी या आशिया (Asia) खंडातील सर्वात मोठया झोपडपट्टीत (slum) सुमारे १५ लाख लोकसंख्या राहते. या झोपडपट्टीत आरोग्याच्या (health) पुरेशा सोयी नाहीत. करोना विषाणूची सर्वाधिक लागण झालेल्या रुग्णांत धारावीतील संख्या चिंताजनक आहे.
आव्हाड यांनी पत्रात नमूद केले आहे की, धारावीत चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा नसल्याने उपचार यंत्रणा कोलमडून पडली आहे. सर्वसामान्य नागरिकांत धारावीबद्दल नकारात्मक भावना आहे. सर्व धर्म, जातीच्या नागरिकांचे वास्तव्य असलेल्या या झोपडपट्टीचा पुनर्विकास (redevelopment) हा महाविकास आघाडी सरकारसाठी राजकीय (political), सामाजिक (social) आणि आर्थिकदृष्ट्या (economical) फायदेशीर मुद्दा ठरेल.
आव्हाड पत्रात पुढे नमूद करतात की करोनामुळे मुंबईची (Mumbai) अर्थव्यवस्था कोलमडून पडली आहे. बांधकाम व्यवसाय (construction sector) अडचणीत आहे. अशा वेळी धारावी पुनर्विकास हा अर्थकारणाला चालना मिळेल. त्यामुळे, मुख्यमंत्री ठाकरे यांनी यासंदर्भात लवकरात लवकर बैठक आयोजित करावी, अशी मागणी आव्हाड यांनी केली आहे.
धारावी पुनर्विकास योजनेला तत्कालीन देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारने चालना दिली होती. परंतु, असंख्य अटीशर्तीमुळे पुनर्विकासासाठी विकासकांनी (developers) उत्साह दाखवला नव्हता. अखेर म्हाडानेच (Mhada) धाराविचा पुनर्विकास करावा, असा निर्णय घेण्यात आला होता.