एकनाथ खडसे यांची फडणवीसांवर जोरदार टीका

Twitter : @maharashtracity

जळगाव: एकनाथ खडसे यांचे मालक आता बदलले आहेत आणि ते सांगतील तसे खडसे यांना वागावे लागते, अशी बोचरी टीका करणारे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एकनाथ खडसे यांनी अत्यंत कडव्या शब्दात समाचार घेतला आहे.अजित पवार यांच्यासोबत पहाटेचा शपथविधी केला आणि सरकार स्थापन केले, त्यावेळी अजित पवार तुमचे मालक होते का? असा सवाल खडसे यांनी फडणवीस यांना विचारला आहे.

“शासन आपल्या दारी” या कार्यक्रमासाठी देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जळगावच्या दौऱ्यावर होते. यावेळी कापसाच्या प्रश्नावरून राष्ट्रवादी काँग्रेसने देवेंद्र फडणवीस यांच्या वाहनांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले. यामुळे संतप्त झालेल्या फडणवीस यांनी त्यांच्या भाषणातून खडसे यांच्यावर टीका केली. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शरद पवार यांचे नाव न घेता फडणवीस म्हणाले की, खडसे यांना आता नवीन मालक मिळाला आहे, ते सांगतात तसेच खडसे यांना वागावे लागते.

फडणवीस यांच्या टीकेला उत्तर देताना खडसे म्हणाले की, फडणवीस आज ज्या पक्षात आहेत, त्या पक्षात मी गेली 40 वर्षे होतो, म्हणजे मी त्यांचा मालकच होतो. खडसे पुन्हा पुढे म्हणाले की फडणवीस यांनी अजित पवार यांच्यासोबत सरकार स्थापन केले होते, त्यावेळी अजित पवार तुमचे मालक होते का? असा असावा करून खडसे यांनी फडणवीसांना डिवचले आहे. मी जर नालायक होतो तर इतके वर्ष माझ्या हाताखाली काम का केले, असाही प्रश्न त्यांनी फडणवीस यांना विचारला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here