@maharashtracity

मी फक्त सत्ताधारी नेत्यांवरच आरोप करणार!

अंबाजोगाई: अंबाजोगाई (Ambajogai) दौऱ्यावर आलेल्या भाजप नेते किरीट सोमैय्या (Kirit Somaiya) पत्रकार परिषदेत भाजप नेत्यांच्या घोटाळ्यावर का बोलत नाहीत, असे पत्रकारांनी विचारल्यावर सोमैय्या यांनी आपण मागील दोन वर्षात सत्तेत आलेल्या महाविकास आघाडीच्या (MVA) नेत्यांवरच आरोप करणार आहोत, असे स्पष्ट केले.

सोमैय्या पुढे म्हणाले, भाजपच्या नेत्यांचे (BJP leaders) कुणाचे काही घोटाळे (scam) असतील तर ते मला माहित नाही. माझ्याकडे राज्यातून तक्रारी येतात. मात्र त्या भाजप नेत्यांच्या नसतात, असे म्हणत भाजप नेत्यांच्या हजारो कोटींच्या भ्रष्टाचाराकडे डोळेझाक करणार असल्याची कबुलीच सोमैय्या यांनी दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

Also Read: विद्यापीठाचे कुलगुरू युवा सेनेची किचन कॅबिनेट ठरवणार: आशिष शेलार

पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना किरीट सोमैय्या यांची चांगलीच दमछाक झालेली पाहायला मिळाली.

धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) न्यायप्रविष्ट असलेल्या प्रकरणात आरोपांच्या फैरी झाडणाऱ्या सोमैय्या यांचे बीड (Beed) जिल्ह्यातील भाजपच्या बड्या नेत्यांच्या घोटाळ्यांकडे काही पत्रकारांनी लक्ष वेधले, त्या घोटाळ्यांमधील पीडित देखील सामन्यात शेतकरी, गोरगरीब असल्याचेही लक्षात आणून दिले. मात्र किरीट सोमैय्या यांनी त्या प्रश्नांना बगल दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here