किशोर तिवारी यांची मागणी

मुंबई

कृषीविषयक मुद्यांबाबत आणि शेतकरी आत्महत्या (farmers suicide) रोखण्यासाठी मानवाधिकार आयोगाच्या धर्तीवर ‘महाराष्ट्र किसान हक्क आयोगाची’ (Maharashtra Farmer’s Rights Commission) स्थापन व्हावी, अशी मागणी कृषी कार्यकर्ते आणि शिवसेना (Shiv Sena) नेते किशोर तिवारी (Kishor Tiwari) यांनी केली आहे. 


तसंच, मानवाधिकार आयोगाच्या अंतर्गत  ‘महाराष्ट्र किसान हक्क आयोगाची’ (MFRC) स्थापना करण्याचा प्रस्ताव तिवारी यांनी मुख्यमंत्री (CM) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे दिला असल्याचे त्यांनी सांगितले.  कृषीतज्ञांना शेतीविषयक विविध मूलभूत समस्यांकडे लक्ष देण्याची गरज आहे. लागवडीसाठीचा खर्च किंवा शेतीमालाच्या स्थिरतेसाठी निधी व्यवस्थापन, पाण्यासाठ्याचे समान वितरण, पाऊस आणि भूमिगत पाणी साठ्यावर कसे नियंत्रण आणता येईल, याचा अभ्यास करण्याची गरज असल्याचे तिवारी यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. 


मानवाधिकार आयोगाच्या धर्तीवर ‘महाराष्ट्र किसान हक्क आयोगाची’ स्थापना करून  शेतकऱ्यांना त्यांचे न्यायिक अधिकार मिळवून द्यावेत, असेही तिवारी यांनी यावेळी सांगितले.  या आयोगामुळे तीन दशकांहुन अधिक प्रलंबित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या समस्येवर आणि आत्महत्यांवर तोडगा निघण्यास मदत होईल. शेतकरी समस्या आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या मुद्यांवर शेतकरी कार्यशाळेचे आयोजन करण्याची गरज असल्याची तिवारी यांनी सांगितले. 


शेतकऱ्यांना कर्जमुक्ती (loan waiver), अनुदान (subsidy) विनामूल्य अन्न (food) आणि आरोग्य सेवा (health service) दिल्याने कृषी संकटांवर कायमस्वरूपी मात करता येणार नाही, असेही तिवारी म्हणाले. आतापर्यंत, विदर्भात (Vidarbha) सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत.  गेल्या अनेक दशकांत येथील शेतकऱ्यांनी पीक नुकसानीमुळे कर्जबाजारीपणातून आपलं जीवन संपवलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here