मुंबई
महाराष्ट्राचे (Maharashtra) मुख्यमंत्री (CM) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्यातील विविध विद्या शाखेत अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या लाखो विद्यार्थ्यांना आज परीक्षेच्या तणावातून मुक्त केले आहे. करोनामुले या विद्यार्थ्यांची परिक्षा घेणे सुरक्षित नसल्याने त्यांना मागील सर्व सत्र परिक्षेत मिळालेल्या गुणांची सरासरी काढून उत्तीर्ण करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. 


जनतेला संबोधित करतांना मुख्यमंत्री ठाकरे यांनी त्यांची सर्व विद्यापीठाच्या (University) कुलगुरुसमवेत (Vice-Chancellor) झालेल्या बैठकीची माहिती दिली. ते म्हणाले, या बैठकीत अनेक पर्यायांवर चर्चा झाली आणि सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार, जे विद्यार्थी अंतिम वर्षात शिक्षण घेत होते आणि केवळ परीक्षा न झाल्याने त्यांच्या पुढील भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला होता, त्यांना मागील सत्र परीक्षेतील सरासरी गुणांचा विचार करून उत्तीर्ण केले जाईल.

ठाकरे म्हणाले, काही विद्यार्थ्यांना सरासरीपेक्षा जास्त गुण मिळण्याचा विश्वास असेल, असे विद्यार्थी सप्टेंबर किंवा ऑक्टोबर मध्ये स्वतंत्र परीक्षा देऊ शकतील.
या निर्णयाचा अर्थ असा की जे विद्यार्थी तीन वर्षांचा अभ्यासक्रम करत असतील, त्यांना मागील पाच सत्रात मिळालेल्या गुणांची सरासरी काढून उत्तीर्ण केले जाईल. तर जे विद्यार्थी चार वर्षीय जसे की अभियांत्रिकी (Engineering), कृषी (Agriculture), वैद्यकीय (medical) आणि अन्य व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण करत असतील त्यांचे मागील सात सत्रातील गुणांची सरासरी काढून उत्तीर्ण केले जाईल.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी पहिलीचे आणि अन्य शालेय वर्ग तातडीने सुरू करण्यास अनुकूल नसल्याचे स्पष्ट केले. विद्यार्थ्यांचे आरोग्य ही प्राथमिकता असून शाळा सुरू करण्यापेक्षा शिक्षण सुरू करणे महत्वाचे असल्याचे ठाकरे म्हणाले. यासाठी इ-लर्निंग (e-learning), ऑनलाइन (online) यासारख्या पर्यायाचा विचार केला जात आहे. मोबाईल कंपन्यांशी बोलून एसडी कार्ड मिळाले तर त्या माध्यमातून टॅब किंवा मोबाईलवर शिक्षण सुरू करता येईल का? या ही पर्यायाचा सरकार विचार करत आहे, असे ठाकरे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here