Twitter: @maharashtracity

By Sadanand Khopkar

मुंबई: आपल्या मतदार संघातील विविध प्रश्‍नांवर तयारी करून सदस्य सभागृहात येतात. विविध संसदीय आयुधांचा वापर करून ते आपले प्रश्‍न सभागृहात मांडतात. मात्र, सरकारमधील मंत्री सदस्यांच्या प्रश्‍नांचा उत्तर देण्यासाठी सभागृहात उपस्थित नसतात. त्यामुळे अनेक वेळा सभागृह स्थगित करण्याची वेळ येते, ही गंभीर गोष्ट आहे, हे वारंवार घडत आहे. या प्रकरणी संबंधितांना कठोर शब्दांत समज देण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधानसभेत केली.

आज सकाळी ९.३० ते १०.४५ या वेळेत विधानसभा विशेष बैठक कालावधीत एकूण नऊ लक्षवेधी सूचना दाखवल्या होत्या. मात्र, मंत्रीच उपस्थित नसल्याने त्या- त्या लक्षवेधी सूचना सदस्यांना मांडता आल्या नाहीत. त्यामुळे अजित पवार यांनी हा विषय नंतर उपस्थित केला. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही याप्रकरणी नोंद घेत मंत्री उपस्थित नसल्याविषयी तीव्र नापसंती व्यक्त केली, तसेच याची गंभीर नोंद घ्यावी, असे निर्देश सरकारला दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here