विरोधी पक्ष नेते अंबादास दानवेंची आग्रही भूमिका

चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यातील धारीवाल वीज प्रकल्पामुळे बाधित शेतकऱ्यांना न्याय देणार असल्याची आग्रही भूमिका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (LoP Ambadas Danve) यांनी घेतली.

धारीवाल वीज प्रकल्पाने (power project) वीज निर्मितीसाठी आवश्यक पाणीसाठयासाठी एकच तळे बांधून साठवणूक केली. त्यामुळे जिल्ह्यातील येरूर व सोनेगाव येथील शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्या पाणीसाठा तळ्याची दानवे यांनी आज पाहणी केली.

शेतकऱ्यांना भरपाई मिळावी यासाठी जिल्हाधिकारी प्रशासनाने पुढाकार घेतला. शेतकऱ्यांच्या नुकसानाची भरपाई (compensation) देण्याबाबत मोबदला दिला जाणार आहे, त्या रक्कमेत तफावत आहे. मात्र आज धारिवाल वीज प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी दानवे यांच्यासोबत केलेल्या बैठकीत यावर तोडगा काढून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याचे मान्य केले. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असे दानवे यांनी म्हटले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here