@maharashtracity
यवतमाळ: शिवसेना सोडून गेले त्यांना हरवण्यासाठी स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करा, निवडणुकीत विजय आपलाच होईल, असा विश्वास विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (LoP Ambadas Danve) यांनी शिवसैनिकांना दिला. हे संकट म्हणजे संधी आहे, असे ते म्हणाले. “You Can win” हे ब्रीद वाक्य लक्षात ठेवा आणि संघटना मजबूत करण्यासाठी काम करा, असा कानमंत्र दानवे यांनी दिला.
दानवे विदर्भ (Vidarbha) दौऱ्यावर असून यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक, महिला आघाडी, युवासेना पदाधिकाऱ्यांशी त्यांनी
संवाद साधला.
ते म्हणाले, आज आपल्यासमोर आव्हाने असली तरी, शिवसेना (Shiv Sena) ही सामान्य माणसांची आहे आणि सामान्य माणूस आजही आपल्याशी जोडला गेलेला आहे. जे सोडून गेले ते स्वतःच्या स्वार्थासाठी गेले. त्यांच्या माथी लागलेला गद्दार (Gaddar) हा शिक्का कधीही मिटणार नाही, अशी टीका त्यांनी केली.
यवतमाळ जिल्ह्यातील कोणते ही प्रश्न असो, कुठेही चुकीची घटना घडली असो, तुम्ही मला बोलवा, मी येथे येईल. तसेच जनसामान्यांचा आवाज बनत तो उठेवेल, अशी ग्वाही अंबादास दानवे यांनी दिली. येणाऱ्या काळात शिवसेना प्रत्येक ठिकाणी पोहचली पाहिजे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली संघटना मजबूत करण्यासाठी, पक्षवाढीसाठी सर्वांनी जोमाने तयारीला लागा, अशा सूचना त्यांनी केल्या.
जिल्ह्यातील शिवसैनिक, पदाधिकारी हे शिवसेनेच्या पाठीशी उभे असल्याचा विश्वास जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी दिला.