@maharashtracity

भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांचे खुले आव्हान

मुंबई: ‘मी पंतप्रधानांबद्दल बोललो नाही, माझ्या मतदारसंघातल्या गुंडाबद्दल बोललो’ हा नाना पटोले यांचा खुलासा धादांत खोटारडेपणा आहे’, असा आरोप महाराष्ट्र भाजपाचे (Maharashtra BJP) उपाध्यक्ष माधव भांडारी (Madhav Bhandari) यांनी केला आहे.

नाना पटोले (Nana Patole) यांनी त्या गावगुंडाचे छायाचित्र आणि संपूर्ण माहिती प्रसिद्ध करावी, असे आव्हानही भांडारी ह्यांनी दिले आहे.

‘स्वत:च्या मतदारसंघात जनतेला त्रास देणाऱ्या गावगुंडाचा (goon) कायदेशीर बंदोबस्त करण्याची भाषा सत्ताधारी पक्षाचा प्रदेश अध्यक्ष वापरत नाही, हे महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेचे (law and order) खरे चित्र आहे, असे स्पष्ट करून माधव भांडारी म्हणाले की, “महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षाचा प्रदेश अध्यक्ष कायद्याचे संरक्षण जनतेला देऊ असे न म्हणता कायदा झुगारून खून (murder) करण्याची भाषा वापरतो, ही वस्तुस्थिती भयावह आहे.”

कायद्याचे राज्य ही कल्पनाच काँग्रेसला (congress) मान्य नाही आणि केवळ खूनखराब्याचे राजकारण करणे हाच काँग्रेसचा स्वभाव आहे हे आता स्पष्ट झाले आहे. केवळ हिंसाचारावर अवलंबून असणाऱ्या काँग्रेस संस्कृतीचे नाना पटोले हे अस्सल प्रतिक आहेत’ अशी टीका देखील भांडारी यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here