@maharashtracity
महाराष्ट्रातील राजकीय पक्ष संतापले
मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा राजीनामा घ्या -अरविंद सावंत
या प्रकरणी संसदीय कारवाई व्हायला हवी – महापौर किशोरी पेडणेकर
कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी वाणीवर नियंत्रण ठेवावे अन्यथा मनसे त्यांच्यावर नियंत्रण ठेवेल – संदीप देशपांडे
मुंबई: एका बाजूला पंतप्रधान छत्रपती महाराजांची (Shivaji Maharaj) स्तुती करत असतात तर दुसऱ्या बाजूला भाजपा सरकार (BJP govt) असलेल्या राज्यात छत्रपतींचा अपमान केला जातो. हे देशाला अशोभनीय कृत्य असून याची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याची मागणी देशाचा देव असलेल्या छत्रपती महाराजांच्या अवमान प्रकरणी केली जात आहे.
(vandalise of Shivaji statue) छत्रपती अवमान प्रकरणी महाराष्ट्रातील राजकीय पक्ष संतप्त झाले असून कर्नाटक सरकार (Karnataka government) आणि केंद्र सरकारवर कडाडून हल्ला केला आहे.
यावर बोलताना शिवसेनेचे अरविंद सावंत (Shiv Sena MP Arvind Sawant) यांनी जळजळीत प्रतिक्रिया दिली. देशाच्या देवांचा अपमान होतो, तरीही चंपा की डंफा कोणीच बोलत नाहीत. कर्नाटकात भाजपा सरकार असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली. छत्रपती शिवाजी महाराजांसोबत आहोत असे दाखवायचे असल्यास आधी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी सावंत यांनी केली आहे.
पुढे घणाघाती हल्ला चढवतानाच सावंत म्हणाले की, कानडी बांधवांनो, तुम्ही महाराष्ट्रात राहता. इथे तुम्हाला त्रास होत नाही. शाळा बंद केल्या जात नाही. तुम्ही तुमच्या सरकारला सांगा अन्यथा महाराष्ट्रात राहणे कठीण होईल असा इशारा सावंत यांनी दिला.
सेनेने सत्व आणि तत्त्व सोडलं नाही. सेनेला मूळ स्वभावावर यायला देऊ नका, असा इशारा देतानाच छत्रपती शिवाजी महाराज हे धगधगता अग्नी आहेत. त्यांचा अवमान झाल्यावर सर्वांचीच बोबडी वळली आहे.
सावंत म्हणाले, पंतप्रधानांनी (PM Modi) काशीतील कार्यक्रमात शिवाजी महाराजांचं आदराने नाव घेतल. तरीही भाजपा सरकार असलेल्या राज्यात छत्रपतींचा अपमान होतो. त्यामुळे आधी बोम्मईंचा राजीनामा घ्या आणि मगच छत्रपती शिवाजी महाराजांसोबत असल्याचे दाखवा.
शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या बोम्मईंचा राजीनामा घेण्याची मागणी करणारे घराघरातून पत्रं जाऊ द्या. पेटून उठा हेच शिवसेनेने शिकवले आहे, असंही सावंत यांनी सांगितलं.
महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांनी टिकेची झोड उठवत विटंबना निषेधार्थ शिवाजी पार्कात (Shivaji Park) जोरदार आंदोलन केले. मावळ्यांना त्रास द्याल तर पंतप्रधानांच्या खुर्चीपर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही, असा थेट इशाराच पेडणेकर यांनी भाजपला दिला.
पूर्वीपासूनच भाजप सरकारने त्रास देण्याचे काम सुरू केलं असून त्यातूनच ईडी आणि पीडी लावली जात आहे. हिंमत असेल तर लावा ईडी. जिवंत माणसांना त्रास देत आहात. तो सहन करतो. पण मावळ्यांना त्रास दिला तर पंतप्रधानांच्या खुर्चीपर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिला.
कर्नाटकातील लोकांप्रमाणेच केंद्र सरकार वागत आहे. कर्नाटक भारतातच आहे ना? मग पाकिस्तानात (Pakistan) किंवा चीनमध्ये (China) असल्यासारखे का वागत आहेत? असा सवाल त्यांनी केला. आता महाराष्ट्र पेटला आहे. वेळीच कर्नाटक राज्य सरकारने वेळीच आवर घ्यावी असा इशाराही त्यांनी दिला.
उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी (Balasaheb Thackeray) मराठा आणि हिंदूंना एकवटले होते. शिवसेना शिवाजी महाराजांचा वसा घेऊन जात आहे. देशाची आर्थिक नाडी मुंबईच्या हातात आहे. आम्हीही शांत बसणार नाही, असं त्या म्हणाल्या.
हिंदुस्थान चांगला बनवला तर तुमचे आभार मानू. पण पुतळ्याची विटंबना करणारी अवलाद तुमच्यात असेल तर त्याच्या गळ्याचा घोट घेतल्याशिवाय राहणार नाही. इतिहास बदलण्याचा प्रयत्न कराल तर भूगोल बदलल्याशिवाय राहणार नाही. कर्नाटक महाराष्ट्राची बॉर्डर आहे. तिथे शिवसैनिक तुमचा इतिहास बिघडवल्याशिवाय राहणार नाही. शिवसैनिक वाघिणी फाडून टाकतीलच. अशा निंदनीय प्रकरणी संसदीय कारवाई व्हायला हवी, तसेच कायद्याने कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही पेडणेकर यांनी केली.
मनसेच्या संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी थेट कानडी भाषेतून कर्नाटक राज्य सरकारला इशारा दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजजरा एसरन्नो अपमान माडवेडी, (मराठी माणूस छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमना कदापिही सहन करणार नाही) असा इशाराच देशपांडे यांनी दिला आहे.
’निम्म वडागीन राजकारणं द सलवागी, छत्रपती शिवाजी महाराजजरा एसरन्नो अपमान माडवेडी, अदन्न नाव यावागलो, सहस्सोदिला, मानंगिला न्यूतुळकळी.‘ म्हणजे महाराजांचा अपमान कधीही सहन केला जाणार नाही. हे त्यांनी समजून घ्यावे.
कर्नाटकमध्ये दोन पक्षाचं जे अंतर्गत राजकारण सुरू आहे. त्या अंतर्गत राजकारणात महाराजांचा झालेला अपमान मराठी माणूस कधीही सहन करणार नाही हे लक्षात ठेवा, असा इशारा देशपांडे यांनी दिला आहे.
कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी वाणीवर नियंत्रण ठेवावे अन्यथा मनसे त्यांच्यावर नियंत्रण ठेवेल असे ही ते पुढे म्हणाले. बेळगावात मराठी भाषिकांच्या गळचेपी करायची. सनदशीर मार्गाने सीमाप्रश्नी लढा देत असलेल्या मराठी भाषिकांवर कन्नड कर्मठांकडून हल्ला करायचे. असे भ्याड प्रकार थांबविण्याऐवजी त्याला खतपाणी घालायचे हे चालणार नाही.
बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत अघटीत घडले आहे, तर त्याची कसून चौकशी करायलाच हवी. या प्रकाराकडे डोळेझाक करू नका. गेले कित्येक वर्ष कर्नाटकातील मराठी बांधवांवर अत्याचार केला जात आहे आणि आता तर शिवरायांसारख्या देशाच्या आराध्य दैवताची विटंबना करण्याची घटना घडते आणि तेथील सरकार याकडे डोळेझाक करते हे दुर्दैवी आहे, असे देशपांडे म्हणाले.
देशाची संस्कृती चिरडण्याचा जेव्हा जेव्हा प्रयत्न झाला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांसारखे पराक्रमी राजे निर्माण झाले असे कौतुकोद्गार पंतप्रधानांनी काढले होते. या कार्यक्रमास काही दिवस झाले नाही तोच, भाजप शासित कर्नाटकात याच शिवरायांची विटंबना होते आणि कुणावर कारवाई न करता उलट मराठी माणसाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो हे अतिशय निंदनीय आणि अवमानकारक आहे.