@maharashtracity

शिवसेनेच्या तक्रारीची मंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतली दखल

धुळे: धुळे शहरातील देवपूर परिसरात भुमिगत गटार योजनेत (underground drainage project) चेंबरचे काम निकृष्ट झाले आहे. याबाबत शिवसेनेने (Shiv Sena) केलेल्या तक्रारीची दखल घेऊन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil) यांनी या कामाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

याआधी शिवसेनेने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (MJP), धुळे महापालिकेकडे (Dhule Municipal Corporation – DMC) या नित्कृष्ट कामाची तक्रार केली होती. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही.

शहरातील देवपूर परिसरात भुमिगत गटार योजनेच्या कामात 145 किलोमीटर पैकी आतापर्यंत 125 किलोमीटर काम झाले आहे. उर्वरीत 22 किलोमीटरचे काम शिल्लक आहे. या कामासाठी 30 कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. तरीही 131 कोटी रुपयांपैकी 95 कोटी रुपये ठेकेदाराला (contractor) अदा केले गेलेले आहे.

ठेकेदाराला महापालिका व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने जास्तीचे बिल दिले आहे. त्यातही या योजनेतील चेंबरचे काम निकृष्ट झाले आहे. या कामाची चौकशी करावी, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख डॉ. तुळशीराम गावीत, महानगर प्रमुख मनोज मोरे, सतीश महाले, उपमहानगर प्रमुख ललित माळी, संजय वाल्हे यांनी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे केली होती.

त्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांनी अतिरिक्त मुख्य सचिवांना चौकशीचे आदेश दिल्याचे शिवसेनेतर्फे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here