मराठी भाषा निमित्ताने महिलांना ऊर्जा बचतीचे धडे देण्याचे प्रयत्न
@maharashtracity
मुंबई: मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आदिवासी महिलांना कुकर वाटप करण्याचा संकल्प करण्यात आला असून यां संकल्पाला सुरुवात झाली असल्याचे सांगण्यात आले.
मनसे वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष तसेच फ्लाय फाऊंडेशनश्चे अध्यक्ष मुनाफ ठाकूर यांनी हा उपक्रम आयोजित केला आहे. आगामी महिनाभरात विविध ठिकाणच्या आदिवासी पाड्यांवर १ हजार आदिवासी कुटुंबांमध्ये महाराष्ट्र सैनिक हे कुकर पोहोचवणार असल्याचा संकल्प यावेळी करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, पवईतील साई बांगोडा, उलटन पाडा येथील आदिवासी महिलांना कुकर वाटप करण्यात आले. यात मनसे प्रभाग क्र. १२५ उपशाखाध्यक्ष राहुल कदम यांनी पुढाकार घेतल्याने त्यांचे शर्मिला राज ठाकरे यांच्या हस्ते शिवतीर्थ निवासस्थानी मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
कित्येक आदिवासी महिला अजूनही चुलीवर जेवण करत असून ऊर्जा बचत विचारांपासून दूर आहेत. तसेच आदिवासी पाड्यांवर महिलांना कुकर भेट देणार असे कळविल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला असल्याचे राहुल कदम यांनी सांगितले. यांतून ऊर्जा बचतीचा संदेश नक्की पोहचेल, असेही कदम म्हणाले. दरम्यान, कुकर वाटप करताना शिवतीर्थ निवासस्थानी पक्षाच्या सरचिटणीस रिटा गुप्ता यांच्यासह आदिवासी महिला उपस्थित होत्या.