विधानभवनाच्या पायर्‍यांवर उतरत जोरदार घोषणाबाजी

Twitter: @maharashtracity

मुंबई: शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे झालेच पाहिजेत… अवकाळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळालीच पाहिजे… जाहीर करा, जाहीर करा शेतकऱ्यांना भरपाई जाहीर करा… कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही…बळीराजाला मदत मिळालीच पाहिजे… मंत्री तुपाशी शेतकरी उपाशी… नुकसान भरपाई जाहीर करा, नाहीतर खुर्च्या खाली करा… अशा घोषणांनी महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) आमदारांनी विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला. 

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा आज सहावा दिवस असून अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी (MVA demands monetary assistance to farmers) यासाठी महाविकास आघाडी आमदारांनी विरोधी पक्षनेते अजित पवार (LoP Ajit Pawar) आणि अंबादास दानवे (LoP Ambadas Danve) यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली. (MVA stages protest at Vidhan Bhavan)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here