By अनंत नलावडे
Twitter : @NalavadeAnant
नागपूर: शेतकरी हैराण सरकार खातो गायरान… खोके लुटा कधी गायरान लुटा… सुरतला चला कधी गुवाहटीला चला… ५० द्या कुणी ८२ द्या, शिंदे सरकारला द्या…भूखंड घ्या कुणी गायरान घ्या सत्तारला द्या, कुणी राठोडला द्या… गद्दार बोलो कभी सत्तार बोलो… राजीनामा द्या राजीनामा द्या, भूखंडाचा श्रीखंड खाणारे राजीनामा द्या… जनतेकडून पैसे घेणार्या अब्दुल सत्तार यांचा निषेध… अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी मंगळवारी सातव्या दिवशीही भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या व सरकारच्या विरोधात आंदोलन केले.
आज अधिवेशनाचा सातवा दिवस असून विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या आमदारांनी शिंदे फडणवीस सरकारमधील मंत्र्यांच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. विधानपरिषदेच्या आवारातून ही दिंडी विधानसभेच्या पायर्यांवर काढण्यात आली. टाळच्या आवाजाने विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला.