@maharashtracity

शिवसेनेकडून मुंबईची मागणी पूर्ण होताच धुळ्यात राष्ट्रवादीची मागणी

धुळे: मुंबई महापालिकेच्या (BMC) धर्तीवर धुळे (Dhule) शहरातील 500 चौरस फुटांच्या घरांचा मालमत्ता कर रद्द करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे (NCP) करण्यात आली आहे. याबाबत सोमवारी राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने आयुक्त देविदास टेकाळे यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले.

यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष रणजीत भोसले, महेंद्र शिरसाठ, जितेंद्र पाटील, राजेंद्र चौधरी, हाजी हाशिम कुरेशी, राज कोळी, कमलेश देवरे, जगन ताकटे, राजेंद्र सोलंकी, नंदु येलमामे, उमेश महाले, आबिद मन्यार, मुख्तार मन्सुरी, कैलास चौधरी आदी उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, नुकतेच मुंबई महापालिकेने पाचशे चौरस फुटांच्या घरांचा मालमत्ता कर (property tax) रद्द करण्याचा निर्णय घेतला. मुंबई मनपाप्रमाणे लवकरच राज्यातील औरंगाबाद (Aurangabad), नाशिक (Nashik), पुणे (Pune), जळगाव (Jalgaon) मनपात निर्णय घेतले जाणार आहे.

त्याच धर्तीवर धुळे मनपा (Dhule Municipal Corporation – DMC) प्रशासनानेही निर्णय घ्यावा. धुळे शहरामध्ये मोठया प्रमाणात मजुर (labour) कारागीर, शेतकरी पुत्र (farmers), छोटे व्यवसायीक (businessmen), छोटे व्यापारी (traders), खाजगी कर्मचारी वास्तव्यास आहेत.

त्यासाठी नवीन वर्षासाठी ही एक मोठी भेट असेल. 500 फुटांपर्यंत घरांचा मालमत्ता कर रद्द करुन धुळेकर नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केली आहे.

शिवसेनेचीही मागणी

शिवसेनेनेही (Shiv Sena) 500 चौरस फुटापर्यंत घरांना मालमत्ता कर माफ करावा, अशी मागणी मनपा आयुक्तांकडे केली आहे. तसेच याबाबत महासभेत प्रस्ताव मांडून तो मंजूर करुन घ्यावा. त्यानंतर तो प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवावा.

शासनाकडून तो मंजूर करुन घेण्यासाठी आम्ही मदत करु. या चांगल्या कामात शिवसेना आपल्यासोबत आहे, असे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख डॉ. तुळशीराम गावीत, महेश मिस्तरी, सतिष महाले, मनोज मोरे, किरण जोंधळे आदींनी पत्र दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here