Twitter: @maharashtaracity

मुंबई: खारघर मधील दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या डॉ नितीन करीर यांच्या समितीला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेप घेतला आहे. करीर हे अत्यंत प्रामाणिक अधिकारी असून ते सरकारला त्यांचीच चूक कशी दाखवू शकतील, असा प्रश्न उपस्थित करून यातून प्रामाणिक असलेले डॉ नितीन करीर यांचीच बदनामी होऊ शकेल, ती करू नका असे आवाहन डॉ आव्हाड यांनी केले आहे.

आव्हाड म्हणतात,  खारघरमध्ये घडलेल्या दुर्घटनेची एक सदस्यीय चौकशी समिती नियुक्त कृली आहे सदस्याचे नाव नितीन करीर असून ते वरिष्ठ सनदी (आय ए एस) अधिकारी आहेत. कर्तव्यनिष्ठ, प्रामाणिक, अत्यंत हुशार आणि कायद्याच्या चौकटीबाहेर न जाणारे अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. पण, सरकारच्याच हाताने झालेली चूक आणि त्याची चौकशी ते कसे काय करु शकतील, याबद्दल मात्र शंका आहे. यामध्ये सरकारकडून झालेल्या चुका त्यांच्या निदर्शनास आणून द्यायच्या हे  नितीन करीर हे करु शकतील का ? अशी शंका आव्हाड यांनी उपस्थित केली आहे.

आव्हाड म्हणतात, नितीन करीर यांच्या एकंदर कारकिर्दीबद्दल महाराष्ट्रातील कुठल्याच राजकारणी व्यक्तीच्या मनात शंका नाही. पण जर चौकशीच करायची असेल आणि महाराष्ट्राला सत्य कळूच द्यायचे असेल, तर मा. उच्च न्यायालयाच्या एका निवृत्त न्यायाधीशामार्फत या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करणे गरजेचे आहे. नितीन करीर यांच्यामार्फत चौकशी करण्यापेक्षा चौकशी न केलेलीच बरी. उगाच सनदी अधिकाऱ्याना का बदनाम करावे. 

नितीन करीर यांची कारकिर्द निष्कलंक आहे. त्यांनी ही जबाबदारी, ज्यामुळे बदनाम होण्याची शक्यता आहे, ती नाकारावी. कारण इतिहास या गोष्टीसाठी आता कोणालाच माफ करणार नाही.

महाराष्ट्राला सत्य कळलेच पाहिजे, असे आव्हाड म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here