@maharashtracity

मुंबई: राज्यात गुरुवारी १५,२५२ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७७,६८,८०० झाली आहे. आज ३०,२३५ रुग्ण बरे होऊन घरी गेले.

राज्यात आजपर्यंत एकूण ७४,६३,८६८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.०७ % एवढे झाले आहे. तर राज्यात आज रोजी एकूण १,५८,१५१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

दरम्यान, राज्यात गुरुवारी ७५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८३ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,५०,९९,६५४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७७,६८,८०० (१०.३४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ९,०५,६९६ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर २,६१० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबईत ८३४ बाधित

मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ८३४ एवढे कोरोना रूग्ण आढळले. आतापर्यंत मुंबईत एकूण १०,४८,४३० रुग्ण आढळले. तसेच ७ रुग्णांचा मृत्यू झाल्याने मुंबईतील एकूण मृत्यूची संख्या १६६४७ एवढी झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here