मुंबई: एकीकडे सक्तवसुली संचालनालय (Enforcement Directorate -ED) महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (Maharashtra State Cooperative Bank – MSC Bank) अर्थात शिखर बँक घोटाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress Party – NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे नाव आरोपी म्हणून घेतले आहे आणि यामागे सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा (Bharatiya Janata Party – BJP) हात आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून होत आहे. मात्र, भाजपने ही आपली संस्कृती (Culture) नाही, असे स्पष्ट करतांना भाजपाने पवारांना अडचणीत आणले नसल्याचे सांगितले.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पक्ष कार्यालयात पत्रकारांशी बोलताना सांगितले की, पवार साहेब आमचे आदर्श (idol) आहेत. आम्ही त्यांचा आदर करतो. राज्याच्या विकासात (development) पवार साहेबांचे मोठे योगदान आहे. त्यांना अडचणीत आणण्याचा आमचा हेतू नाही आणि सरकारने पवार साहेबांवर घोटाळ्याचे आरोप केले नाहीत किंवा सरकारने त्यांचे नाव आरोपपत्रात समाविष्ट केले नाही. न्यायालय (court) आणि आर्थिक गुन्हे अन्वेषण (Economic Offence Wing – EOW) विभागाने त्यांचे नाव गोवले आहे, असे पाटील म्हणाले.

शिखर बँक घोटाळ्याचा पाठपुरावा करणारे आणि उच्च न्यायालयाच्या आदेशाने पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात भाग पडणारे माहिती अधिकार कार्यकर्ते सुनील अरोरा (Sunil Arora) यांना भाजपचा छुपा पाठिंबा असल्याच्या प्रश्नाला त्यांनी स्पष्ट शब्दात नाही असे उत्तर दिले. अरोरा हे भाजपचे कार्यकर्ते नाहीत आणि बँक घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश काँग्रेस सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री (Chief Minister) पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी दिला होता, याकडे पाटील यांनी लक्ष वेधले. सुडाचे राजकारण करण्याची महाराष्ट्राची आणि आमची परंपरा नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबद्दल बोलतांना प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले की ते स्पष्टवक्ते आहेत. अजित आमचे मित्र आहेत. त्यांच्या मनात एक आणि ओठात एक असे नसते.

पाटील यांनी स्पष्ट केले की सरकारने कधीही दावा केला नाही की बँक घोटाळा 25 हजार कोटींचा आहे की 10 हजार कोटींचा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here