@maharashtracity
नांदेड: हा देश तपस्वींचा आहे, महापुरुषांबरोबरच शेतकरी, कष्टकरी हेसुद्धा तपस्या करत आहेत. पण मोदींच्या राजवटीत (Modi government) त्यांना त्यांच्या कष्टाचे फळ मिळत नाही. स्वतंत्र भारतात पहिल्यांदाच शेतीच्या औजारांवर, खतांवर कर लावला आहे. देशात पैशाला काही कमी नाही. शेतकरी (farmers), कामगार (labours) यांच्या खिशातून मोदी खोऱ्याने पैसे ओढून घेत आहेत आणि दोन-चार उद्योगपतींना देत आहेत. पण शेतकऱ्यांना कर्जमाफी (loan waiver to farmers) मिळत नाही, असा घणाघाती हल्ला खा. राहुल गांधी यांनी नांदेडच्या जाहीर सभेत केला.
नवा मोंढा मैदानावरील जाहीर सभेत
जनसमुदायाला संबोधित करताना राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी सरकारवर तोफ डागली. ते म्हणाले की, नोटबंदींचा (demonstration) निर्णय चुकला तर मला चौकात फाशी द्या असे मोदी म्हणाले. डोळ्यात अश्रूही आणले. पण नोटबंदी अपयशी ठरली. काळा पैसा संपला का ? पंधरा लाख रूपये आले का ? असा सवाल उपस्थित करत महाराष्ट्रातील उद्योग बाहेर जात आहेत. पंधरा लाख जसे गायब झाले तसेच हे उद्योगही गायब झाले, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.