मुंबई: महाराष्ट्र (Maharashtra) विधान परिषदेच्या (Upper House) सध्या सुरू असलेल्या निवडणुकीत विधानसभा (Lower House) मतदारसंघातून परिषदेत निवडून द्यायच्या रिक्त ९ पैकी २ जागा राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) लढणार आहे. यातील एका जागेसाठी पक्षाच्या खासदार (MP) सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी त्यांच्या विश्वासू रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्या नावाची शिफारस केल्याचे सूत्रांकडून कळते. चाकणकर या राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद सदस्य हेमंत टाकले, आनंद ठाकूर आणि किरण पावसकर हे तिघे सदस्य २४ एप्रिल रोजी निवृत्त झाले. टकले हे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जातात. पण त्यांचे वय हे त्यांना पुन्हा तिकीट मिळण्यात अडचणीचे ठरू शकते.

विधानसभा सदस्य हे या निवडणुकीत मतदार असतात. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ५४ सदस्य आहेत आणि त्यांना शेतकरी कामगार पक्षाचा (PWP) पाठिंबा आहे. तसेच काँग्रेसकडे असलेल्या (Congress) अतिरिक्त मताच्या बळावर राष्ट्रवादी काँग्रेस दोन सदस्य निवडून आणेल. यापैकी पक्षाने पहिली पसंती रुपाली चाकणकर यांना दिल्याचे समजते.

तत्कालीन महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी कौटुंबिक कारणास्तव राष्ट्रवादी पक्षाला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश केला. वाघ यांच्यानंतर रिक्त झालेल्या पदावर पुण्यातील (Pune) रुपाली चाकणकर यांची नियुक्ती करण्यात आली. त्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विश्वासातील असून नियुक्तीनंतर त्यांनी राज्यभर दौरे करून नेतृत्व सिद्ध केले आहे. ‘ही मुलुख मैदान तोफ परिषदेत आली तर विरोधी पक्ष असलेल्या भाजपला बोलायची संधी मिळणार नाही,’ अशी प्रतिक्रया राष्ट्रवादीतील एका नेत्याने व्यक्त केली.

पक्षाकडे दुसऱ्या जागेसाठी असंख्य इच्छूक असले तरी मुंबईकर (Mumbai) किरण पावसकर (Kiran Pawaskar) यांना पुन्हा संधी दिली जाईल, अशी शक्यता आहे. कामगार नेते (Union leader) असलेले पावसकर यांची युनियन स्टार हॉटेलमध्ये सक्रिय आहे. पक्षाचे माजी मुंबई अध्यक्ष सचिन अहिर (Sadhin Ahir) यांनी शिवसेनेत (Shiv Sena) प्रवेश केल्यापासून राष्ट्रवादीकडे मुंबईत ‘रसद’ पुरविण्याची ताकद असलेला सक्षम नेता नाही. म्हणूनच पावसकर यांना पुन्हा संधी दिल्यास पक्षाला सर्वार्थाने ‘ताकद’ मिळेल, असे म्हटले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here